Thursday, June 19, 2025

WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर पोहोचली टीम इंडिया

WTC: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉईंट्स टेबलमध्ये टॉपवर पोहोचली टीम इंडिया

केपटाऊन: भारतीय संघाने(indian team) केपटाऊन कसोटीत दक्षिण आफ्रिकेला ७ विकेटनी हरवले. या विजयासह भारतीय संघाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५च्या पॉईंट्समध्ये मोठा फायदा मिळाला आहे. यजमान आफ्रिकेला हरवल्यानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचली आहे. तर हरणारा आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.


वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप २०२३-२५च्या चक्रात भारतीय संघाने आतापर्यंत चार कसोटी सामने खेळले आहेत. यात त्यांनी २ सामन्यात विजय मिळवला. एकामध्ये पराभव तर एक अनिर्णीत ठरला. ४ पैकी २ सामन्यात विजय मिळवल्यानंतर भारताची विजयी टक्केवारी ५४.१६ झाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेची विजयी टक्केवारी ५० टक्क्यांवर पोहोचली आहे. आफ्रिकेने आतापर्यंतच्या नव्या टेस्ट चॅम्पियनशिपमधील चक्रात दोन कसोटी सामने खेळले आहेत. यात एक गमावला आणि एक जिंकला.


पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टक्केवारी ५० टक्के आहे. ते तिसऱ्या स्थानावर आहेत. न्यूझीलंडनेही २ सामने खेळले आहेत यात त्यांनी एकामध्ये विजय मिळवला तर एक गमावला आहे. बांगलादेश पाचव्या स्थानावर आहे. पॉईंट्स टेबलमध्ये पाकिस्तान सहाव्या स्थानावर आहे. सध्याच्या वेळेस पाकिस्तानचा संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे येथे त्यांनी तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावले आहेत.



भारताकडून आफ्रिकेचा लाजिरवाणा पराभव


भारतीय संघाने दुसऱ्या कसोटीत यजमान दक्षिण आफ्रिकेला ७ विकेटनी हरवले. यात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराजने कमाल केली. आफ्रिकेच्या पहिल्या डावात सिराजने ६ विकेट मिळवल्या. त्यानंतर दुसऱ्या डावात बुमराहने ६ विकेट आपल्या नावे केले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा