Wednesday, April 23, 2025
Homeदेशकतारमध्ये ८ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या शिक्षेविरोधात अपील करणार भारत! परराष्ट्र मंत्रालयाचे अपडेट

कतारमध्ये ८ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या शिक्षेविरोधात अपील करणार भारत! परराष्ट्र मंत्रालयाचे अपडेट

कतार: कतारच्या जेलमध्ये बंद असलेले ८ माजी नौदल अधिकाऱ्यांना २८ डिसेंबरला दिलासा देताना येथील कोर्टाने मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती दिली होती. यातच गुरूवारी भारताने सांगितले की ते ८ लोकांना मिळालेल्या शिक्षेच्या विरोधात ६० दिवसांच्या आत अपील करू शकतात.

परराष्ट्र मंत्रालयाचे नवे प्रवक्ता रणधीर जायस्वाल म्हणाले, कतारच्या कोर्ट ऑफ अपीलने २८ डिसेंबरला निर्णय सुनावला होता. यानंतर आम्ही सांगितले की या आठ लोकांच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. आमच्या कायदेशीर टीमकडे कोर्टाची ऑर्डर आहे. ही गोपनीय ऑर्डर आहे. आम्ही इतके नक्की म्हणू शकतो की आठही जणांना विविध कालावधीची शिक्षा मिळाली आहे.

ते पुढे म्हणाले, मृत्यूची शिक्षा संपली आहे. आमच्याकडे ६० दिवसांचा कालावधी आहे आणि आम्ही कतारच्या सर्वोच्च न्यायलय The Court of Cassationचा दरवाजा ठोठावू शकतो. याबाबतीत कायदेशीर टीम काम करत आहे. आम्ही कायदेशीर टीम आणि कुटुंबियांच्या संपर्कात आहोत.

काय म्हणाले परराष्ट्र मंत्रालय?

८ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना दिलासा देण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाने २८ डिसेंबरला म्हटले होते की आम्ही यांच्यासोबत सुरूवातीपासून उभे राहिलो आहोत. आमचे राजदूत आणि अन्य अधिकारी कुटुंबाती सदस्यांसोबत आहेत. आम्ही या केसच्या सुरूवातीपासून त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही त्यांना नेहमी सहकार्य करत राहू.

काय आहे प्रकरण

कतार स्थित अल दहरा ग्लोबल टेक्नॉलॉजीमध्ये काम करत असलेल्या ८ भारतीय माजी नौदल अधिकाऱ्या ऑगस्टमध्ये हेरगिरीच्या संशयावरून अटक करण्यात आली होती. त्यानंतर या सर्वांना २६ ऑक्टोबरला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. दरम्यान कतारने या आरोपांबाबत काही म्हटले नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -