Thursday, July 4, 2024
Homeक्रीडाIND vs SA: केपटाऊनमध्ये द. आफ्रिकेला हरवणारा आशियातील पहिला देश ठरला भारत

IND vs SA: केपटाऊनमध्ये द. आफ्रिकेला हरवणारा आशियातील पहिला देश ठरला भारत

केपटाऊन: केपटाऊनमध्ये(capetown) टीम इंडियाने(team india) इतिहास रचला. भारताने दक्षिण आफ्रिकेला दुसऱ्या कसोटीत सात विकेटनी हरवले. यासोबतच टीम इंडियाच्या नावावर मोठा रेकॉर्ड केला आहे. खरंतर, केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेला कसोटी सामन्यात हरवणाला आशियातील पहिला देश ठरला आहे. तर टीम इंडियाने ३१ वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा केपटाऊनमध्ये विजय मिळवला.

तर ओव्हरच्या हिशेबाने कसोटी क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात लहान कसोटी सामना ठरला. या कसोटी सामन्यात केवळ १०७ षटकांचा खेळ होऊ शकला. केपटाऊनमध्ये भारताविरुद्ध नेहमी जिंकणारा आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात केवळ ५५ धावांवर गारद झाला. यानंतर दुसऱ्या डावात एडन मार्करमने जबरदस्त शतक ठोकले. मात्र संपूर्ण संघ १७६ धावांवर बाद झाला.

दक्षिण आफ्रिकेत भारताने पाचव्यांदा अनेक कसोटी सामने जिंकले आहेत. याआधी दक्षिण आफ्रिकेत टीम इंडियाने २०२१, २०१८, २०१० आणि २००६मध्ये विजय मिळवला होता. दरम्यान, केपटाऊनमध्ये याआधी भारताला कधीही विजय मिळवता आला नव्हता.

केपटाऊनमध्ये खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटीत आफ्रिकेने पहिल्या डावात केवळ ५५ धावा केल्या होत्या. यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात १५३ धावा केल्या. यात भारताने ९८ धावांची आघाडी घेतली होती. याच्या प्रत्युत्तरात आफ्रिकेने दुसऱ्या डावात १७६ धावा केल्या. भारतासमोर ७९ धावांचे आव्हान ठेवले. भारतीय संघाने तीन विकेट गमावताना दीड दिवसांतच केपटाऊन कसोटी जिंकली.

भारतासाठी मोहम्मद सिराज आणि जसप्रीत बुमराह विजयाचा हिरो ठरला. सिराजने पहिल्या डावात केवळ १६ धावा देत ६ विकेट मिळवल्या. यानंतर दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेच्या संघाला खिंडार पाडली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -