Face pack: ग्लोईंग स्किन हवीये तर नाचणी फेसपॅकचा करा वापर

मुंबई: सुंदर आणि डागविरहित त्वचा कोणाला आवडत नाही. खासकरून महिला स्किन ग्लोईंग करण्यासाठी अनेक गोष्टी ट्राय करतात. चेहऱ्यावर ग्लो मिळवण्यासाठी दर महिन्याला हजारो रूपये खर्च करतात. अनेकदा फेशियलमुळेही चांगला रिझल्ट येत नाही. त्वचेवर चमक आणण्यासाठी आणि त्वचेचा निखार वाढवण्यासाठी सगळ्यात चांगला उपाय म्हणजे नाचणीचा फेसपॅक. नाचणी खाण्यासाठी जितकी फायदेशीर असते त्यापेक्षा अधिक चेहऱ्यावरील याचा वापर ग्लो करण्यासाठी केला जातो.


नाचणी म्हणजेच फिंगर मिलेट दक्षिण भारतातील प्रसिद्ध धान्य आहे. गहू, तांदूळ यानंतर सर्वाधिक पिकवले जाणारे धान्य म्हणजे नाचणी. नाचणीमध्ये अनेक पोषकतत्वे आढळतात. प्रोटीन, कार्बोहायड्रेट, कॅल्शियम, आर्यन, व्हिटामिन बी कॉम्प्लेक्स. याशिवाय नाचणीमध्ये अँटी ऑक्सिडंट गुणही असतात जे शरीराल फ्री रेडिकल्सपासून वाचवतात. स्किनकेअरमध्येही नाचणीचा वापर केला जातो. नाचणीमधील अँटी ऑक्सिडंट आणि व्हिटामिन ई त्वचा हेल्दी ठेवण्याचे काम करतात. यामुळे त्वचेचा रक्तसंचार वाढतो.



कसा तयार करावा नाचणीचा फेस पॅक


नाचणीचा फेस पॅक बनवणे अतिशय सोपे आहे. यासाठी सगळ्यात आधी नाचणीचे पीठ - १ चमचा, दही अर्धा चमचा, मध अर्धा चमचा, लिंबाचा रस १ चमचा. सगळ्यात आधी एका वाटीत नाचणीचे पीठ, दही आणि मध घ्या. ते चांगले मिसळा. यात लिंबाचा रस मिसळा. सर्व साहित्य एकत्र करून पेस्ट तयार करा.



कसा कराल वापर


नाचणीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावा आणि १५-२० मिनिटे सुकू द्या. त्यानंतर थंड पाणी अथवा कोमट पाण्याने चेहरा धुवा. आठवड्यातून २-३ वेळा नाचणीचा फेस पॅक लावल्याने त्वचेमध्ये रंगत येते.

Comments
Add Comment

दिवाळी आलीये, कमी वेळेत घर करा चकाचक!

मुंबई : सण असो वा रोजची साफसफाई, घर स्वच्छ ठेवल्याने सकारात्मकता आणि उत्साह येतो. बाजारातील महागड्या

मायग्रेन का होतो? आणि त्याचे सुरुवातीची लक्षणे काय आहेत?

मायग्रेन ही एक प्रकारची तीव्र डोकेदुखी आहे जी सामान्य डोकेदुखीपेक्षा वेगळी असते. त्यामुळे डोक्याच्या एका भागात

वारंवार पेनकिलर घेत असाल तर आधी हे वाचा !

मुंबई : थंडीच्या दिवसात हवामानात झपाट्याने होणाऱ्या बदलांचा अनेकांच्या तब्येतीवर परिणाम होतो. अंगदुखी, ताप

झोप न लागण्याची समस्या? या सवयी बदलतील तुमचं आयुष्य!

मुंबई : खरंतर, हल्लीच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीमुळे झोपेच्या समस्या खूपच वाढल्या आहेत. चुकीच्या

कार्डिओ व्यायाम करताना या चुका टाळा!

मुंबई : वजन कमी करायचं असो किंवा हृदयाचं आरोग्य राखायचं असो, अनेकजण कार्डिओ हा व्यायाम प्रकार निवडतात. पण अनेकदा

स्वस्त किंवा जुना प्रेशर कुकर वापरताय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा! आरोग्यासाठी ठरू शकतो मोठा धोका

मुंबई: स्वयंपाकघरात रोज वापरला जाणारा प्रेशर कुकर तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो. विशेषतः जर तुमचा कुकर