Suruchi Adarkar : लग्नानंतर काही दिवसांतच सुरुची अडारकरने घेतला 'हा' मोठा निर्णय

  423

सुरुची होणार व्हिलन


मुंबई : अभिनेत्री सुरुची अडारकर (Suruchi Adarkar) नुकतीच ६ डिसेंबर रोजी अभिनेता पीयुष रानडेसोबत (Piyush Ranade) विवाहबंधनात अडकली. विशेष म्हणजे पीयुषचं हे तिसरं लग्न आहे, तर सुरुचीने पहिल्यांदा लग्नगाठ बांधली आहे. लग्नानंतर काही दिवसांतच सुरुचीने अजिबात वेळ न दवडता कामाला सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. सुरुचीला 'का रे दुरावा' (Ka Re Durava) या मालिकेतून प्रचंड लोकप्रियता मिळाली होती. यानंतर ती तब्बल ८ वर्षांनी पुन्हा एकदा झी मराठीवर (Zee Marathi) दिसणार आहे. यावेळेस ती खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तिचा हा अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.


झी मराठीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' (Satavya Mulichi Satavi Mulgi) ही मालिका सध्या चांगली गाजत आहे. यात तितिक्षा तावडे आणि अजिंक्य ननावरे प्रमुख भूमिकेत आहेत. शिवाय ऐश्वर्या नारकर यांची महत्त्वाची भूमिका आहे. याच मालिकेतून सुरुची दमदार एंट्री करण्यासाठी सज्ज झाली आहे.


सुरुचीचं पात्र मालिकेतील विरोचकाच्या सेवकाशी संबंधित असल्याचं तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अभिनेत्री या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत झळकण्याची दाट शक्यता आहे. भूमिकेसाठी सुरुचीला काहीसा ग्लॅमरस लूक देण्यात आला आहे. ६ जानेवारीला प्रसारित होणाऱ्या भागात सुरुची एन्ट्री घेणार आहे.


‘का रे दुरावा’ या मालिकेतून अभिनेत्री सुरुची अडारकर घराघरांत लोकप्रिय झाली. या मालिकेत सुरुचीसह सुबोध भावे व सुयश टिळक हे दोन अभिनेते प्रमुख भूमिकेत होते. २०१४ मध्ये सुरू झालेल्या या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला होता. अखेर २०१६ मध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. यानंतर सुरुचीने छोट्या पडद्यावरील अनेक मालिका व चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. आता ‘का रे दुरावा’नंतर तब्बल ८ वर्षांनी ती पुन्हा एकदा ‘झी मराठी’वर पुनरागमन करायला सज्ज झाली आहे.

Comments
Add Comment

ऑनलाईन लोनच्या नावाखाली तरुणीची फसवणूक, अश्लील फोटो केले व्हायरल

मुंबई : मुंबईच्या जोगेश्वरी भागात राहणाऱ्या तरुणीची ऑनलाइन फसवणूक करून तिचे अश्लील फोटो नातेवाईकांना

इंडिगोची ‘हॅपी इंडिगो डे सेल’ घोषणा, देशांतर्गत प्रवास १,२१९ पासून तर आंतरराष्ट्रीय ४,३१९ पासून

मुंबई: इंडिगोने आपल्या १९ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘हॅपी इंडिगो डे सेल’ची घोषणा केली आहे. प्रवाशांना केवळ ₹१,२१९

या योजनेतून दर महिन्याला मिळतील ७ हजार रूपये...पाहा काय आहे ही योजना

मुंबई: भारतीय आयुर्विमा महामंडळाने महिलांसाठी एक विशेष योजना सुरू केली आहे, 'एलआयसी विमा सखी' (LIC Bima Sakhi). ही योजना

युगेंद्र पवारांचा साखरपुडा, मुंबईत पवार कुटुंब एकत्र

मुंबई : काही दिवसांपूर्वी अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांच्या पुण्यात साखरपुडा झाला. आता अजित पवार यांचे भाऊ

मुंबईत अपघात; कार उलटली, दुभाजक ओलांडून पलिकडच्या रस्त्यावर गेली आणि...

मुंबई : रविवार म्हणजे अनेकांसाठी सुटीचा, विश्रांतीचा दिवस. यामुळे मुंबईकर निवांत असतात. पण आजच्या रविवारची

Megablock: मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज मेगा ब्लॉक

मुंबई: मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रविवारी मेगा ब्लॉक