Sunday, May 11, 2025

महामुंबईमहाराष्ट्रताज्या घडामोडी

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत आजपासून हायकोर्टात सुनावणी

Dhangar Reservation : धनगर आरक्षणाबाबत आजपासून हायकोर्टात सुनावणी

काय आहे धनगरांची मागणी?


मुंबई : राज्यभरात मराठा समाजाच्या आरक्षणावरुन (Maratha Samaj reservation) चांगलाच वाद पेटला आहे. मराठा आणि ओबीसी (OBC) समाजातील वाद सुरु असताना यात धनगरांच्या आरक्षणाचा (Dhangar Reservation) मुद्दाही चर्चेत आला. धनगर आरक्षणासाठी देखील ठिकठिकाणी उपोषण करण्यात आले. राज्यातील धनगर समाजाला अनुसूचित जमातीत (Scheduled caste) समाविष्ट करावे, यासाठी धनगरांचा लढा सुरु आहे. धनगरांच्या या मागणीवर आजपासून हायकोर्टात (High Court) होणार सुनावणी होणार आहे.


धनगरांना अनुसूचित जमातीत समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. शासन दरबारी धनगड अशी नोंद आहे. मात्र, राज्यातील धनगर हे धनगड नसून धनगर आहेत, असं या याचिकेत म्हटलं आहे. या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे ही सुनावणी महत्त्वाची मानली जात असून त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


सध्या राज्यातील धनगर समाजाला ओबीसीचे राजकीय आरक्षण असून, धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे म्हणजेच एसटीचे आरक्षण देण्याची मागणी होत आहे. तर, धनगर समाजाला आरक्षण मिळेल आणि निकाल आमच्याच बाजूने लागेल असा विश्वास भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment