मुंबई : लोअर परेल पुलाच्या बांधकामानंतर आता मुंबई महानगरपालिका नव्या पुलाचे बांधकाम हाती घेणार आहे. पुढच्या काही दिवसांतच सायन-धारावी-वांद्रे-माहिम या परिसराला जोडणारा सायन रेल्वे स्थानकासमोरचा ११० वर्ष जुना पुल पाडला जाणार आहे. पुलाचे पाडकाम पूर्ण झाल्यानंतर पुन्हा नव्या पुलाचे बांधकाम सुरू होणार आहे.
रेल्वेकडून पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या कामाकरता सध्याचा पूल पाडून नवा पूल उभारण्याचा प्रस्ताव मुंबई महापालिकेला देण्यात आला आहे. पूर्व द्रुतगती महामार्ग आणि धारावी, माहीम आणि वांद्रे यांना जोडणारा ११० वर्ष जुना सायन रेल्वे ओव्हरब्रिज हा महत्त्वाचा कनेक्टर आहे.
मध्य रेल्वे पाचव्या आणि सहाव्या रेल्वे मार्गावरील पुलाची पुनर्बांधणी करत आहे. यासाठी सायन-धारावीचा हा पुल पाडला जाईल. मुंबई महापालिकेने माहिमची जत्रा संपल्यानंतर म्हणजे ४ जानेवारीनंतर हा पुल बंद करण्याची परवानगी मध्य रेल्वेला दिली आहे. माहिमची जत्रा संपल्यानंतर नेमक्या कोणत्या दिवशी पूल बंद करायचा याचा निर्णय मध्य रेल्वेने अद्याप घेतलेला नाही.
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…
मुंबई : उन्हाळ्याचा प्रभाव खुपच वाढत आहे.उन्हाळ्यात बहुतेक लोक शरीर थंड ठेवण्यासाठी दही खातात. पण…
हैदराबाद : दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू (Mahesh Babu) यांना रिअल इस्टेट (Real Estate Groups) गुंतवणूकदारांच्या…
वादळ, हिमनद्या वितळणे, अवकाळी पावसासारख्या वाढल्या आपत्तीच्या घटना ठाणे (प्रशांत सिनकर) : जगभरात २२ एप्रिल…
ऑर्लँडो : अमेरिकेतील ऑर्लँडो आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Orlando International Airport) डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाला आग लागली. मात्र,…
मुंबई: यंदाच्या वर्षी ३० एप्रिलला अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त आहे. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले…