Tuesday, May 13, 2025

महाराष्ट्रताज्या घडामोडीनाशिक

Ramdas Athawale : वंचित आणि ठाकरे गटाच्या १२-१२ फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू

Ramdas Athawale : वंचित आणि ठाकरे गटाच्या १२-१२ फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू

रामदास आठवले यांची सणसणीत टीका


नाशिक : सध्या राज्यभरातील सर्वच पक्षांनी निवडणुकांसाठी कंबर कसली आहे. महाविकास आघाडीकडून वाद नसल्याचे दाखवण्यात येत असले तरी त्यांच्यात जागावाटपावरुन मतभेद होत आहेत, हे स्पष्ट आहे. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरेंसोबत (Uddhav Thackeray) युती केल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी वंचित बहुजन आघाडीवर सणसणीत टीका केली. शिवाय महायुतीचाच (Mahayuti) विजय होणार, असा विश्वास व्यक्त केला.


केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे आज धुळे शहरात आले असता शासकीय गुलमोहर विश्रामगृह येथे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी वंचित आणि ठाकरे गटाच्या १२-१२ फॉर्मुल्याचे आम्ही बारा वाजवू, अशी टीका रामदास आठवले यांनी केली.


रामदास आठवले म्हणाले, वंचित आणि ठाकरे गटाची युती झालेली आहे की नाही आपल्याला माहित नाही, मात्र प्रकाश आंबेडकरांना युती करायची असेल तर ती महाविकास आघाडी सोबत करावी लागेल ठाकरेंसोबत नाही. त्यांचा जो १२- १२ चा फॉर्म्युला ठरला आहे तो अतिशय योग्य असून आम्हाला त्यांचे बारा वाजवता येतील, असं आठवले म्हणाले.


पुढे आठवले म्हणाले, इंडिया आघाडीने आम्हाला कितीही हरवण्याचे प्रयत्न केले तरी २०२४च्या निवडणुकीत आम्हाला कुठलीही अडचणी येणार नाही. इंडिया आघाडीला आम्हाला हरवण्याचा अधिकार असला तरी सुद्धा आमचाच विजय होईल. मतदार जनता त्यांच्या बाजूने गेली तरच आम्ही हरु शकतो. मात्र मतदार जनता आमच्या सोबत असल्यामुळे आमच्या हरण्याचा प्रश्नच येत नाही, असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.


Comments
Add Comment