अयोध्या: अयोध्येत बांधण्यात आलेल्या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेचा सोहळा २२ जानेवारीला होणार आहे. या सोहळ्यासाठी अयोध्येत प्रशासन आणि सरकार पूर्णपणे तयारीत आहे. दुसरीकडे राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेसाठी तीन मूर्तींपैकी एकाची निवड होणार होती. आता ही निवड करण्यात आलीआहे. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशींनी सोशल मीडियावर याचा फोटो शेअर केला आहे.
केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशीने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सोमवापी एक फोटो शेअर केला. यात त्यांनी म्हटले, अयोध्येत भगवान रामाच्या प्राण प्रतिष्ठेसाठी मूर्तीच्या निवडीला अंतिम रूप देण्यात आले आहे. आमच्या देशाचे प्रसिद्ध मूर्तीकार योगीराज अरूण यांनी बनवलेली भगवान रामाची मूर्ती अयोध्येत स्थापित केली जाणार आहे.
दरम्यान, काही मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे की हा फोटो चुकीने त्यांनी शेअर केला आहे यानंतर तो व्हायरल होत आहे. यासाठी योगीराज अरूणच्या एका सोशल मीडिया पोस्टचा हवाला दिला आहे.
याआधी कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बीएस येदुयुरप्पा यांनीही दाव केला होता की अरूण योगीराज यांनी तयार केलेली मूर्ती अयोध्येतील राम मंदिरासाठी निवडण्यात आली आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले होते की म्हैसूरचे मूर्तीकार अरूण योगीराज यांनी बनवलेली मूर्ती राम मंदिराच्या स्थापनेसाठी निवडण्यात आले आहे. यामुळे राज्यातील सर्व राम भक्तांचा गौरव आणि आनंद द्विगुणित झाला आहे. यासाठी त्यांनी अरूण योगीराज यांचे अभिनंदन केले होते.
श्रीनगर : सलग तीन दिवस जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. लडाख या केंद्राशासित भागात…
नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स सोमवार २१ एप्रिल रोजी भारताच्या चार दिवसांच्या दौऱ्यावर…
मुंबई(ज्ञानेश सावंत): सध्या गुजरात टायटन्स आयपीएलच्या गुण तक्त्यात अव्वल स्थानावर आहे. गुजरातने या अगोदरच्या सामन्यात…
रत्नागिरी : विश्व मराठी साहित्य संमेलनात दिल्या जाणाऱ्या साहित्यभूषण पुरस्काराची रक्कम या वर्षीपासून १० लाख…
नागपूर: विविध कार्यक्रमांमध्ये तसेच येथील सव्हिल लाईन्स परिसरातील मुख्यमंत्री सचिवालय-हैदराबाद हाऊसमध्ये प्राप्त होणारे जनतेचे अर्ज…
बंद पडलेली टॉय ट्रेन पुन्हा सुरु; मंत्री पीयूष गोयल यांची घोषणा मुंबई (प्रतिनिधी) : संजय…