मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यात ‘सोम्यागोम्या’ या शब्दावरुन वार पलटवार सुरु होते. अजित पवारांनी संजय राऊत यांचा सोम्यागोम्या असा उल्लेख केल्यानंतर सोम्यागोम्या कोण हे २०२४ च्या निवडणुकीत कळेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं. यावर आज भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रतिक्रिया देत संजय राऊत यांना चांगलंच खडसावलं आहे.
नितेश राणे म्हणाले, भांडुपमध्ये बसून सोम्यागोम्यांनी महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीच्या जागावाटपाबद्दल बोलू नये. तुझी लायकी किती आहे हे तुझ्या मालकाला काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी खडसावलं आहे, याची बातमी आमच्याकडे आहे. उद्धवजींना दहा जनपथवरुन कडक आदेश आले आहेत, की संजय राजाराम राऊतचं थोबाड बंद करा. अशी तंबी मिळाल्यानंतर एरंडेल प्यायल्यासारखा त्याचा चेहरा झाला आहे. म्हणून जागावाटपाच्या चर्चेच्या मोठ्या मोठ्या बाता करण्याअगोदर तुझ्या मालकाची थोडी इज्जत ठेवायची असेल तर सकाळचं थोबाड बंद कर आणि घरी बस, असं नितेश राणे यांनी राऊतांना ठणकावलं.
काशीबाबत वक्तव्य करणार्या संजय राऊतांचा नितेश राणे यांनी चांगलाच समाचार घेतला. ते म्हणाले, सामनामध्ये काशी कलंकीत झाली आहे याबद्दल अग्रलेख लिहिला आहे, असं संजय राऊत म्हणतो. पण काशी कलंकीत खर्या अर्थाने कधी झाली तर काही आठवड्यांअगोदर तुझ्या मालकाचा मुलगा आपल्या पापाचं प्रायश्चित करण्यासाठी काशीत गेला तेव्हा काशीमध्ये गोमूत्र शिंपडण्याची वेळ आली होती. त्यामुळे काशीला शुद्ध ठेवण्याचं काम आमचं हिंदुत्ववादी विचारांचं केंद्र आणि राज्य सरकार निश्तिच पद्धतीने करेल. फक्त तुझ्या मालकाचा मुलगा काशीमध्ये येऊन आपलं पाप धुण्याचा जो प्रयत्न करतो त्याबद्दलही अग्रलेख लिहिलास तर बरं होईल, असं नितेश राणे म्हणाले.
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…
पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…