Accident News : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी काळाचा घाला; पार्टी करुन परततानाच भीषण अपघात!

सहा मित्रांचा जागीच मृत्यू


रांची : देशभरात नववर्षाचं (New year) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे. कालच्या रात्रीही ठिकठिकाणी पार्ट्या करण्यात आल्या आणि सरत्या वर्षाला निरोप देण्यात आला. मात्र, या आनंदाच्या वातावरणात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. न्यू इअर पार्टी करुन परतत असताना एका भीषण अपघातात (Accident) सहा मित्रांचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे ही पार्टी त्यांच्यासाठी अखेरची ठरली. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.


झारखंड (Jharkhand) येथील बिष्टुपूर पोलीस स्टेशन हद्दीतील सर्किट हाऊस भागात आज सकाळी हा अपघात झाला. वेगात असलेल्या कारवरील नियंत्रण सुटल्याने ती पहिल्यांदा डिव्हायडला धडकली आणि नंतर एका झाडावर आदळून उलटली. या दुर्घटनेत कारमधील सहा जणांचा मृत्यू झाला. धडक इतकी जबरदस्त होती की, याचा आवाज खूप दूरपर्यंत ऐकू गेल्याने स्थानिकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेतली.


स्थानिक नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाडीमधून आठजण प्रवास करत होते. त्यापैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर दोघंजण बचावले आहेत. कारमध्ये बसलेले सर्व तरुण दारूच्या नशेत होते.


दरम्यान मृतदेहांना कारमधून बाहेर काढण्यासाठी क्रेनची मदत घेण्यात आली. सर्व मृत तरुण हे आरआयटी पोलीस स्टेशन हद्दीतील कुलुप्तांग येथील आहेत. त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले, तसंच जखमींना बाहेर काढून रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांकडून हे तरूण कुठे पार्टी करण्यासाठी गेले होते याचा शोध घेतला जात आहे.

Comments
Add Comment

Chrome Security Alert : Google Chrome वापरताय? थांबा...पहिलं हे काम करा, केंद्र सरकारचा हाय-अलर्ट

मुंबई : तुम्हीही रोजच्या कामासाठी लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरवर 'गुगल क्रोम' (Google Chrome) ब्राउझर वापरत असाल, तर ही बातमी

Bhandup News : आधी बाबा गेले, आता आईची साथ सुटली; मुलीने मुखाग्नी देत निभावले अंतिम कर्तव्य, भांडुपवासीयांचे डोळे पाणावले

रत्नागिरी : नियतीचा खेळ अथांग आणि अतिशय निष्ठूर असतो, याचाच प्रत्यय आणून देणारी एक दुःखद घटना मुंबईतील भांडुप

12th BRICS Meeting : नवी दिल्लीत आज १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक; हवामान बदल आणि पर्यावरणीय सहकार्यावर होणार मंथन

नवी दिल्ली : भारताच्या BRICS अध्यक्षतेअंतर्गत १२वी BRICS पर्यावरण मंत्रिस्तरीय बैठक आज नवी दिल्लीत आयोजित करण्यात

Gwalior Accident : मध्य प्रदेशात भीषण अपघात; मजुरांच्या वाहनाला ट्रकची धडक, 8 जणांचा मृत्यू

Pritesh Walia : भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया अमेरिकेत ICEच्या ताब्यातून जामिनावर मुक्त

नवी दिल्ली :  भारतीय वंशाचे जॅझ संगीतकार प्रितेश वालिया यांची अमेरिकेत ICEच्या ताब्यात तब्बल 14 दिवस राहिल्यानंतर

Jharkhand Students Protest : 24 दिवसांच्या आंदोलनानंतर झारखंड सरकारचा मोठा निर्णय; JSSC-CGL परीक्षा रद्द

झारखंड : झारखंडमध्ये तब्बल 24 दिवसांपासून सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनाला अखेर यश मिळाले आहे. मुख्यमंत्री