Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य,३१ डिसेंबर ते ६ जानेवारी २०२४

Share

Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, ३१ डिसेंबर ते ६ जानेवारी २०२४

शुभग्रहांची साथसंगत
मेष – या कालावधीमध्ये आपल्याला शुभग्रहांची काही प्रमाणात साथ लाभणार आहे. पण त्याचबरोबर काही उपयोगही होत आहेत. त्यामुळे प्रवास करताना स्वतःला तसेच आपल्या वाहनासह इतर सामानांना सांभाळणे जरुरी आहे. काही प्रमाणात अपेक्षित घटना घडू शकतात. नियोजन केलेल्या कामात व्यस्त येण्याची शक्यता आहे. आर्थिक नियोजन पुन्हा करावे लागणार आहे. खर्चाचे प्रमाण वाढल्यासारखे वाटेल. आपल्या सततच्या कामाने व प्रयत्नाने कामे सुरळीत करण्याचा प्रयत्न निश्चित यशस्वी होईल. व्यापार-व्यवसायात वृद्धी होऊन नफ्याचे प्रमाण वाढेल. आर्थिक बाब मजबूत होईल. वैवाहिक जीवनामध्ये सुसंवाद राहील.
यशदायक कालावधी
वृषभ – काही निर्माण होणाऱ्या शुभ योगामुळे आपल्यासमोरील प्रश्न सुटण्यास सुरुवात होऊन काही प्रश्न सुटतील. कुसंगतीपासून लांब राहणे आवश्यक आहे. त्यातून आपणास त्रास होण्याची शक्यता नाकारता येत नाही. काही शुभग्रहांच्या व अशुभ ग्रहांशी येणाऱ्या योगामुळे तरुणांना काही प्रश्नांना अचानक सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. शुभग्रहांमुळे सर्व बाजूंनी यश येताना दिसेल. नोकरीत आपणास पूरक वातावरण असल्याने आपल्याला नोकरीत प्रसन्नता जाणवेल. आनंदी राहाल. आपले स्थान बळकट होताना दिसेल. त्याचप्रमाणे अधिकारांमध्ये वृद्धी होईल. सरकारी नोकरीमध्ये मात्र लहान-मोठ्या प्रलोभनांपासून दूर राहणे महत्त्वाचे ठरेल.

प्रयत्नांना यश मिळेल
मिथुन – सुरुवातीला आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात. त्यामुळे प्रकृतीकडे लक्ष देणे महत्त्वाचे ठरेल. व्यवसायात तसेच नोकरीच्या ठिकाणी शत्रू- हितशत्रू यांचा त्रास होऊ शकतो. उत्सव समारंभातून रंगाचा बेरंग होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जरा जपूनच बोला. जे विद्यार्थी मेडिकलची तयारी करीत आहेत तसेच सरकारी सेवांसाठी प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी चांगला कालावधी आहे. जे नोकरीसाठी प्रयत्न करत आहेत त्यांचे प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबात छोट्या-मोठ्या कुरबुरी होऊ शकतात. पण शांततेने प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. सुवर्ता मिळतील तसेच विवाहइच्छुक तरुण-तरुणांचे विवाह ठरतील.
नवीन संधीची उपलब्धता
कर्क – सुरुवातीस स्त्री वर्गास व परिणीतांना कुटुंबातून निरनिराळ्या प्रकारे त्रास निर्माण होऊ शकतो. त्यामुळे मनस्ताप संभवतो; परंतु नंतर शुभग्रहांची साथ मिळेल. त्रास संपुष्टात येईल. शुभ ग्रहांच्या जातीने नोकरी-व्यवसायातील व्यक्तींना चांगल्या नवीन संधी निर्माण होतील. फायद्याचे सौदे हाती येतील. घरातील तरुण व्यक्तींचे भाग्योदय होतील. व्यावसायिक करार मतदार होण्याची शक्यता. त्याचप्रमाणे परदेशी संबंध येण्याची शक्यता. ओळखीतून चांगल्या संधी चालून येतील. जुनी व्यावसायिक नाती नव्याने प्रस्थापित होण्याची शक्यता. सरकारी माध्यमातून मदत मिळू शकते. नोकरीत पगारवाढ-पदोन्नतीचे योग आहेत मात्र वाहने जपून चालवा. कामात इतरांचे सहकार्य मिळणार नाही.
गैरसमज टाळावेत
सिंह – आहेत ती नाती सांभाळण्यासाठी आपणास विशेष प्रयत्न करावे लागतील. समज-गैरसमज टाळणे महत्त्वाचे राहील. कोणाच्याही बोलण्यावरती फारसा विश्वास ठेवू नये. आपल्या मनाप्रमाणे वस्तूविषयक व्यवहार होतील. जमीन-जुमला, वडिलोपार्जित संपत्ती याविषयीचे व्यवहार थंडावलेले होते ते आता गतिमान होऊन पूर्णत्वाकडे वाटचाल करतील. त्यातून आर्थिक लाभ होऊ शकतो. आपल्यामध्ये उत्साह राहणार आहे. आपल्या समोरील कामे आपण वेगाने कराल. व्यापार व्यवसायात नवीन संधी येतील. मनाप्रमाणे कार्यक्षेत्रात बदल घडवू शकाल. व्यवसायात भाग्योदय होईल.
फसवणुकीपासून सावध राहा
कन्या – या कालावधीमध्ये शुभग्रहांची आपणास साथ लाभणार आहे. पण कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींकडे लक्ष देणे आवश्यक ठरणार आहे तसेच कोणत्या ना कोणत्या कारणाने विविध क्षेत्रात फसवणूक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लहान-मोठे आपले व्यवहार करताना सर्व प्रकारे काळजी घेणे क्रमप्राप्त आहे. कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणे धाडसाचे ठरू शकते. विशेषतः आर्थिक व्यवहाराबाबत विशेष सावध राहणे जरुरी आहे. आपणास नैसर्गिक साथ मिळणार नाही. स्वतःचे प्रयत्न व कष्ट करून आपणास यश खेचून आणावे लागणार आहे.
आर्थिक आलेख उंचावेल
तूळ –चालू कालावधी विद्यार्थी वर्गाला अतिशय चांगला आहे. अभ्यासात आपली स्मरणशक्ती चांगली राहील. त्याचा आपल्याला फायदा होईल. स्पर्धात्मक यश मिळू शकते. प्रगती होईल. आपणास सर्व प्रकारे सकारात्मकता पाहावयास मिळेल. शांतता लाभेल. गैरसमज दूर होतील. वैवाहिक जीवनात एकमेकांचा सहयोग राहील. आपल्या कार्यक्षेत्रात काम करताना कोणत्या तरी तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला आपणास फायदेशीर ठरणार आहे. व्यवसायात वाढ होऊन आर्थिक स्तरावर लाभदायक असेल. परदेशी संबंध पण येऊ शकतो. काही नवीन ओळखी होतील. कार्यामध्ये काहीही अडचणी आल्या तरी आपण त्या कौशल्याने सोडू शकाल.

विचित्र अनुभव येऊ शकतात
वृश्चिक – रोजच्या जीवनामध्ये आपल्याला काही विचित्र अनुभव येऊ शकतात. नको त्या मंडळींची गाठ-भेट होऊन मनस्ताप होण्याची शक्यता. नोकरीत मात्र चांगले अनुभव येतील. ज्या जातकांना नोकरी नाही अशा जातकांचे नोकरी मिळवण्यासाठी केलेले प्रयत्न सफल होतील. बेरोजगारांना रोजगार मिळेल. ओळखीतून मदत मिळून सहकारी व्यक्तींचे सहकार्य मिळेल. आपल्या कार्यक्षेत्रात चांगले काम करू शकाल. चांगली ऊर्जा असणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात आपण काही धाडसी निर्णय घ्याल ते निर्णय बरोबर ठरल्याने आत्मविश्वास वाढेल. अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो.
कायदेशीर बाबी पाळा
धनु – सुरुवातीला आपल्या रोजच्या जीवनात काही नकारात्मक अनुभव येऊ शकतात त्यामुळे मोठा ताणतणाव निर्माण होऊ शकतो. विशेषतः कायदेशीर कामे निटनेटकी असली पाहिजेत अन्यथा त्याचा त्रास होऊन मनस्ताप होण्याची शक्यता. आर्थिक तोटाही सहन करावा लागेल. विशेषतः सरकारी स्वरूपाच्या कार्यामध्ये कायदेशीर बाबींचे उल्लंघन होता कामा नये. नियम व अटी पाळणे हितकारक सर्वच क्षेत्रात ठरेल. आर्थिक व्यवहार करताना सावध राहणे जरुरीचे आहे. शुभ योगातून अनेक प्रतिष्ठित व्यक्तींची मदत होऊ शकते.
वास्तु-वाहन योग
मकर – सुरुवातीला आपणास सर्व बाजूनी सहाय्य तसेच साथ मिळणार आहे. आपले भाग्य उजळून भाग्योदय होताना दिसेल. आपल्या कलागुणांना वाव मिळून आपले कर्तृत्व सिद्ध करण्याच्या संधी मिळतील. कलागुणांना यश येणार आहे. तरुणांनी अति आत्मविश्वास ठेवू नये तसेच कुसंगत व व्यसने टाळणे हितकारक ठरेल. वाहन चालवताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण हवे. आपल्या नोकरी-धंदा तथा व्यवसायात चांगला कालावधी राहील. व्यापारवृद्धी होईल तसेच नवीन एखादा जोड व्यवसायही होऊ शकतो. प्रतिष्ठित व्यक्तींची मदत मिळेल. नवीन वास्तू अथवा वाहन खरेदी करू शकाल. आपल्या जोडीदाराची चांगली साथ मिळेल. आपल्यामध्ये आत्मविश्वास भरलेला असेल.
आर्थिक फायदा
कुंभ – व्यवसाय-धंद्यात तसेच कॉर्पोरेट क्षेत्रात आपण लाभान्वित्त व्हाल. नवीन करार होण्याची शक्यता, त्यामुळे आपल्याला आपले व्यावसायिक कार्यक्षेत्र वाढवावे लागण्याची शक्यता आहे. मनुष्यबळ तसेच तांत्रिक बाबींमध्ये तज्ज्ञ व्यक्तींच्या सल्ल्याची आवश्यकता भासेल. शेअर मार्केट, वायदे बाजार, तेजीबंदी संबंधित व्यवसाय यामध्ये भरीव आर्थिक फायदा होऊ शकतो. पूर्वी केलेल्या जुन्या गुंतवणुका फायदा मिळवून देतील. मोठे व्यापारी व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहार जपून अथवा सावधानतेने करण्याची गरज आहे तसेच सरकारी नियम-अटी व कायद्याची बंधने पाळली पाहिजेत. ते हितकारक ठरेल. कुटुंब परिवारातील महिलांच्या सुख-सुविधा वाढतील.
ऐश्वर्य- मानसन्मानात वृद्धी
मीन –आपले होणारे खर्च सीमित होऊन नियंत्रणात येतील. आर्थिक परिस्थिती सुधारून दीर्घकालीन गुंतवणुकीच्या संधी प्राप्त होतील. गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला उपयोगी पडू शकतो. तथापि व्यापार व्यवसायातील परिस्थिती समाधानकारक राहिली तरी कार्य पूर्ण करण्यासाठी जास्तीची धावपळ करावी लागू शकते. या दगदगीचा किंवा धावपळीचा आपल्याला फायदाच होईल. व्यावसायिक नवे करार होण्याची शक्यता आहे. आप्तेष्ट नातेवाइकांकडून शुभवार्ता समजतील. कुटुंब परिवारातील महत्त्वाच्या निर्णयात आपला हस्तक्षेप एक नवे वळण देईल. आपले भौतिक जीवन ऐश्वर्यकारक राहून मानसन्मान मिळेल. सामाजिक धार्मिक कार्यात योगदान देण्याची इच्छा होईल. खासगी स्वरूपाच्या नोकरीत प्रगती होऊ शकते.
Tags: horoscope

Recent Posts

Pahalgam Attack: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार, एक ठार तर अनेकजण गंभीर जखमी

पहलगाम: जम्मू-काश्मीरमधील (Jammu and Kashmir) पहलगाम येथील पर्यटकांवर आज दहशतवादी (Pahalgam Terror Attack) हल्ला झाला…

1 hour ago

मत्स्यव्यवसायाला आजपासून कृषीचा दर्जा; राज्यातील ४ लाख ८३ हजार मच्छीमारांना होणार फायदा

ऐतिहासिक आणि क्रांतिकारक निर्णय - मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे मुंबई : मत्स्यव्यवसायाला आजपासून राज्यात कृषीचा…

1 hour ago

फडणवीस सांगतील तसं चालणार! थोपटेंनंतर तांबेही भाजपाच्या दिशेने?

पुणे : पुण्यातून काँग्रेससाठी आणखी एक धक्का देणारी राजकीय कुजबुज सुरु झाली आहे. संग्राम थोपटेंनी…

2 hours ago

Sangram Thopte : पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! काँग्रेसच्या माजी आमदारांनी हाती घेतले ‘कमळ’

पुणे : पुणे भोर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेस पक्षाला अखेर रामराम…

2 hours ago

Tiger Shroff: टायगर श्रॉफला जीवे मारण्याची धमकी! खोटी माहिती देणाऱ्या व्यक्तीला पंजाबमधून अटक

मुंबई: टायगर श्रॉफला (Tiger Shroff) जीवे मारण्याच्या धमकी संदर्भात केलेल्या खोट्या तक्रारीबद्दल, मुंबई पोलिसांनी पंजाबमधील…

2 hours ago

Nitesh Rane : राज्य सरकारचा मत्स्य व्यवसायाबाबत गेमचेंजर निर्णय!

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक…

2 hours ago