Sambhaji Nagar: संभाजी नगरमधील एका कंपनीला भीषण आग, ६ जणांचा होरपळून मृत्यू

  140

संभाजी नगर: महाराष्ट्रच्या संभाजीनगर(sambhajinagar) जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे हातातील मोजे बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये अचानक आग(fire) लागली. या आगीत होरपळून ६ मजुरांचा मृत्यू झाला. या अपघातात ६ मजुरांचा जागीच मृत्यू झाला तर ४ जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी ठरले. ही घटना औद्योगिक क्षेत्रात हाताचे मोजे बनवणारी कंपनी सनशाईन एंटरप्रायजेसमध्ये झाली आहे.


ही दुर्घटना ३० डिसेंबरच्या रात्री घडली होती. या कंपनीत १० कामगार झोपले होते. मोजे बनवणारी कंपनी सनशाईन एंटरप्रायजेस सी २१६, वालाज औद्योगिक क्षेत्रात २० ते २५ कामगारांना रोजगार दिला जातो. १० कामगार कंपनीतच राहत होते. गेल्या रात्री जेव्हा सर्व लोक बाहेर झोपत होते तेव्हा अचानक उष्णता वाढल्याने झोपलेले कर्मचारी जागी झाले. दारावरच आग लागल्याने त्यांना बाहेर पडताच आले नाही. मात्र काही कागारांना पत्रा उचलून झाडाच्या मदतीने बाहेर आले.


 


मृत कामगारांमध्ये मिर्झापूरचे भल्ला शेख, कौसर शेख, इकबाल शेख मगरूफ शेख आणि इतर दोन जणांचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना शनिवारी रात्री उशिरा २.१५ वाजता घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनास्थळी जेव्हा टीम पोहोचली तेव्हा फॅक्टरीमध्ये आग लागली होती. या दरम्यान, स्थानिक लोकांनी सांगितले की फॅक्टरीच्या आत ६ जण अडकले होते.


यानंतर फायर ब्रिगेडचे कर्मचारी आत आले आणि त्यांनी ६ मृतदेह हाती घेतले. कंपनीमध्ये ज्या वेळेस आग लागली त्यावेळेस १०-१५ कर्मचारी आत झोपले होते. यातील चार जण आपला जीव वाचवण्यात यशस्वी झाले. मात्र ६ जण आपला जीव वाचवू शकले नाहीत.

Comments
Add Comment

Nagpur Temple Collapsed: महालक्ष्मी मंदिरातील निर्माणाधीन छत कोसळले, १७ जखमी, ४ जणांची प्रकृती गंभीर

कोराडीच्या महालक्ष्मी मंदिर परिसरातील घटना नागपूर:  नागपूर जिल्ह्यातील कोराडी इथल्या महालक्ष्मी मंदिर

पुणे जिल्ह्याचा कायापालट होणार , ३ नव्या महापालिका तयार होणार

पुणे : पुणे जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यासाठी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठी

महाराष्ट्रातील सरपंचांना दिल्लीत मोठा मान

महाराष्ट्रातील १७ सरपंचांना स्वातंत्र्यदिन सोहळ्यासाठी दिल्लीतून आमंत्रण नवी दिल्ली : यंदाच्या

जमीन विक्रीस हरकत घेणा-या आईचा गळा घोटला; नंतर केली आत्महत्या

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातील सांगवी येथे जमीन विक्रीच्या वादातून मुलाने वयोवृद्ध आईचा खून

अमरावतीत आईने मुलीला तर आत्याने भाच्याला दिले जीवनदान

अमरावती : संदर्भसेवा रुग्णालयात (सुपर स्पेशालिटी) गेल्या दोन दिवसांत दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यात आईने

महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा तत्काळ लागू करावा

मानसिक छळ, मारहाण, लैंगिक अत्याचार, आत्महत्येसारखे गंभीर प्रकार पुणे: महाराष्ट्रात लव्ह जिहादविरोधी कठोर कायदा