Agriculture Loan : शेतकऱ्यांसाठी नववर्ष सुखाचं; मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय

  259

मुंबई : यंदाच्या वर्षात खराब वातावरणामुळे खरीप व रब्बी अशा दोन्ही हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हे वर्ष फारच वेदनादायी होतं. मात्र, येणारं वर्ष (New Year) शेतशकऱ्यांना काहीसा दिलासा देणारं ठरणार आहे. शेतीशी संबंधित कर्ज (Agriculture Loan) वसुलीस स्थगिती देण्यात आली असून कर्जाचे पुनर्गठन करण्याचे आदेश सरकारच्या सहकार आणि पणन विभागाकडून देण्यात आले आहेत. राज्यभरातील ४० दुष्काळी (Drought) तालुक्यांमधील तब्बल १०२१ महसुली मंडळांना सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे.


शासनाने जाहीर केलेल्या परिपत्रकानुसार, जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी ७५ टक्के पर्जन्यमानापेक्षा कमी आणि एकूण पर्जन्यमान ७५० मि.मि. पेक्षा कमी झाले, अशा एकूण १०२१ महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती घोषित करून दुष्काळी भागात उपाययोजना आणि सवलती लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने, व्यापारी बँकांनी यामध्ये सार्वजनिक बँका, खाजगी बँका, प्रादेशिक ग्रामिन बँका, लघुवित्त बैंका या बँकांसह, महाराष्ट्र राज्य सहकारी बँक लि. आणि संबंधित जिल्हा मध्यवर्ती बँकांनी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.


खरीप २०२३ हंगामातील पीक कर्जाच्या परतफेडीचा दिनांक ३१ मार्च २०२४ असल्याने दुष्काळबाधित तालुक्यातील जे शेतकरी विहीत मुदतीत पीक कर्जाची परतफेड करू शकणार नाहीत, अशा शेतकऱ्यांची लेखी संमती घेऊन खरीप २०२३ च्या हंगामातील पीक कर्जाचे व्याजासह भारतीय रिर्जव्ह बँकेच्या निर्देशानुसार पुनर्गठन करण्यात यावे, अशी सूचना परिपत्रकात देण्यात आली आहे. शिवाय ही कारवाई सर्व बँकांनी २० एप्रिल २०२४ पर्यंत पूर्ण करावी आणि अशा शेतकऱ्यांना पुढील हंगामासाठी पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असं परिपत्रकात नमूद केले आहे.

Comments
Add Comment

कोल्हापूर सर्किट बेंचचे लोकार्पण होणार सरन्यायाधीशांच्या उपस्थितीत

मुंबई  : कोल्हापूर सर्किट बेंचचा लोकार्पण सोहळा सरन्यायाधीश भूषण गवई, मुख्य न्यायमूर्ती अलोक आराध्ये आणि

मुंबईत सापडले ‘हे’ दुर्मीळ कासव

मुंबई : चेंबूर परिसरातील एका स्थानिक रहिवाशाला नुकतेच एक दुर्मीळ ल्युसिस्टिक कासव सापडले होते. संबंधित

आणिक आगार ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत धावणार मेट्रो

मुंबई : मुंबईतील मुख्य पर्यटन आकर्षणांपैकी एक असलेल्या 'गेट वे ऑफ इंडिया'ला भुयारी मेट्रोतून जाता येणार आहे. गेट

आठवा वेतन आयोग लवकरच

केंद्र सरकारी कर्मचारी, पेन्शनधारकांना मिळणार दिलासा मुंबई : देशभरातील सुमारे एक कोटींहून अधिक केंद्र सरकारी

रक्षाबंधन २०२५: 'या' वेळेत चुकूनही बांधू नका राखी

मुंबई: भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचे प्रतीक असलेला रक्षाबंधन सण २०२५ मध्ये शनिवार, ९ ऑगस्टला साजरा केला जाईल. या

खड्डा विरहित मंडप उभारण्याची अट कायम, पालिकेने सूचवले आधुनिक तंत्रज्ञान

मुंबई (प्रतिनिधी): गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी खणलेल्या खड्ड्यांवरील वाढीव दंड आकारण्याचा निर्णय मुंबई