Kishori Shahane : अभिनेत्री किशोरी शहाणेकडे भाजपने सोपवली महत्वाची जबाबदारी

मुंबई : मराठी चित्रपटांची नायिका (Marathi actress) म्हणून एक काळ गाजवलेल्या प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे (Kishori Shahane) यांची भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश चित्रपट आघाडीच्या वरिष्ठ उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. ही महाराष्ट्रातील राजकीय पक्षप्रणीत चित्रपट संघटना आहे. या संघटनेसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नावे नुकतीच जाहीर करण्यात आली. त्यात किशोरी शहाणे यांची वरिष्ठ उपाध्यक्षपदी निवड केल्याने संघटना बळकट होणार आहे.


नरिमन पॉइंट येथील भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत भाजप चित्रपट आघाडीसाठी पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली. यावेळी भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र प्रदेशचे सरचिटणीस विक्रांत पाटील, भाजप कामगार मोर्चा महाराष्ट्रचे प्रदेशाध्यक्ष विजयभाऊ हरगुडे यांच्या उपस्थितीत चित्रपट आघाडीच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रे प्रदान करण्यात आली.


चित्रपट आघाडीचे अध्यक्ष समीर दीक्षित यांच्यासह अभिनेत्री किशोरी शहाणे, प्रसिद्ध दिग्दर्शक एन. चंद्रा, नाटय़ निर्माते अनंत पणशीकर, दिग्दर्शक रमेश मोरे, निर्माते दीपक रुईया, अभिनेते कासम अली, डिझायनर आत्मानंद गोलतकर, निर्माते सचिन पैठणकर, चित्रपट कामगार कायदा सल्लागार अजय पाटोळे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमावेळी उपस्थित होते.


किशोरी शहाणे या मराठी व हिंदी चित्रपट आणि मालिकाविश्वातील अत्यंत लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांची जोडी अशोक सराफ यांच्यासोबत हिट ठरली होती. किशोरी यांनी माझा पती करोडपती, आत्मविश्वास, आयत्या घरात घरोबा, नारबाची वाडी, नवरा माझा नवसाचा अशा अनेक मराठी चित्रपटांमधून काम केलं आहे. तसंच त्या काळी सुपरहिट ठरलेल्या माहेरची साडी चित्रपटात देखील त्यांनी महत्त्वाची भूमिका साकारली. सध्या त्या 'कैसे मुझे तुम मिल गये' या झी टीव्हीवरील हिंदी मालिकेत काम करत आहेत.

Comments
Add Comment

BMC News : वरळी, प्रभादेवी आणि लोअर परळ मधील नागरिकांना ३ ते ४ दिवस कचऱ्याची राहणार समस्या

मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महानगरपालिकेच्या ‘जी दक्षिण’ प्रशासकीय विभागात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी

Sarsanghchalak Dr. Mohan Bhagwat : 'जेन-झी' आणि 'जेन-अल्फा' जुन्या पिढीपेक्षा अधिक प्रामाणिक!

- सरसंघचालक डॉ. मोहन भागवत; लोकशाहीत आंदोलनसुद्धा संवादाचेच एक माध्यम मुंबई : "भारताच्या शिक्षणव्यवस्थेत अजूनही

Air India New CEO : टाटांचा मास्टरस्ट्रोक! पाकिस्तानकडे जाणारे टेवोल्डे गेब्रेमरियम आता एअर इंडियाचे नवे बॉस

मुंबई : टाटा समूहाच्या मालकीच्या एअर इंडियाला अखेर नवे नेतृत्व मिळाले आहे. इथियोपियन एअरलाइन्स ग्रुपचे माजी

Mohan Bhagwat : सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचा 'जेन-झी'शी संवाद

Mumbai : शिक्षणाच्या क्षेत्रात अनेक गोष्टी करता येऊ शकतात. मात्र हे सर्व करताना समाजात फूट पाडण्यासाठी नव्हे, तर

Mahalaxmi Dhobi Ghat PNG Gas Connection : महालक्ष्मी धोबीघाट धूरमुक्त होणार! लाकूड-कोळशाला रामराम, १५० पीएनजी गॅस जोडण्यांमुळे प्रदूषणमुक्तीच्या दिशेने पाऊल

मुंबई : मुंबईची ऐतिहासिक आणि जागतिक ओळख असलेल्या महालक्ष्मी धोबीघाटाने (Mahalaxmi Dhobighath) आता वायू प्रदूषणावर मात

Chandrashekhar Bawankule : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची १,०५३ एकर वनजमीन सुरक्षित! महसूलमंत्री बावनकुळेंच्या निर्णयाने वन विभागाचा हक्क कायम

मुंबई : संजय गांधी राष्ट्रीय उद्यानालगतच्या (Sanjay Gandhi National Park forest) महत्त्वाच्या वनक्षेत्राबाबत राज्य सरकारने मोठा