शाहरूख, रजनीकांत नाही तर या हिरोने दिले ७ सलग ब्लॉकबस्टर सिनेमे, कमावले २२५४ कोटी

मुंबई: दक्षिणेत रजनीकांत, कमल हसन आणि प्रभास तर बॉलिवूडचा शाहरूख खान आणि सलमान खानपासून ते आमिर खानपर्यंत यांना बॉक्स ऑफिसचा किंग म्हटले जाते. त्यांचा प्रत्येक सिनेमा ४००-५०० कोटींची कमाई करतो. मात्र दक्षिणेतील असा एक सुपरस्टार आहे ज्याने सलग ७ सिनेमे ब्लॉकबस्टर दिलेत.


आम्ही बोलत आहोत दक्षिणेतील बॉक्स ऑफिस किंग म्हणजेच थलपती विजयबद्दल. या वर्षी ऑक्टोबरमध्ये रिलीज झालेल्या थलपती विजयच्या लिलोने बॉक्स ऑफिसवर हंगामा केला. ६४ कोटींच्या शानदार ओपनिंगनंतर सिनेमाने जगभरात ६०४ कोटींची कमाई केली.


यासोबतच थलपती स्टार लिओ दक्षिणेतील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला. याने बॉक्स ऑफिसवरील रजनीकांतचा जेलर, कमल हसनचा विक्रम आणि ऐश्वर्या राय बच्चनचा पोन्नियन सेलवनलाही हरवले. लिओमध्ये संजय दत्तने निगेटिव्ह भूमिका साकारली होती. त्याच्या अभिनयाला पसंती मिळाली होती. सिनेमाने तृषाने थलपती विजयच्या पत्नीची भूमिका साकारली होती.


लिओ थलपती विजयचा ७वा सिनेमा आहे ज्याने ६५० कोटीहून अधिक कमाई केली आहे. याआधी त्याने सलग ७ सिनेमे ब्लॉकबस्टर राहिले आहेत. याच कारणामुळे विजय सध्या सिनेनिर्मात्यांची पहिली पसंती बनला आहे.


थलपती विजयच्या यशस्वी करिअरबाबत बोलायचे झाल्यास त्याची सुरूवात मर्सलपासून झाली २०१७ मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर २२० कोटींहून अधिक कलेक्शन केले होते. २०१८मध्ये आलेला सरकारही ब्लॉकबस्टर ठरला होता. २५२ कोटींचे कलेक्शन केले होते.


बिगिल २०१९मध्ये रिलीज झाला होता आणि हा सिनेमा सुपरहिट ठरला होता. याने बॉक्स ऑफिसवर २९५ कोटी कमावले होते. तर कोरोना महामारीदरम्यान रिलीज झालेल्या मास्टरने २२३ ते ३०० कोटींचे कलेक्शन केले होते.


२०२२मध्ये रिलीज झालेल्या बीस्टनेही २२० कोटींचा आकडा पार केला होता. तर २०२३मध्ये रिलीज झालेल्या वारिसूने २९७ कोटींचे कलेक्शन केले होते. जर सर्व सिनेमांचे कलेक्शन एकत्र जोडले तर दाक्षिणात्य सुपरस्टार विजयच्या ७ सिनेमांनी आतापर्यंत २२५४ कोटींहून अधिक रूपयांचे कलेक्शन केले आहे.

Comments
Add Comment

मत्स्यव्यवसाय व पशुसंवर्धन क्षेत्रात विकासासाठी महाराष्ट्रात मोठ्या संधी

मत्स्यव्यवसाय सुधारणा व दीर्घकालीन विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक मुंबई : राज्यात

सूर्यकुमार यादवला पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या संतोष जगदाळेंच्या पत्नीने सुनावले

पहलगाम हल्ल्यातील बळींना विजय समर्पित करण्याऐवजी, पाकिस्तानविरुद्ध खेळायलाच नको होते. डोंबिवली: भारताने आशिया

महिला क्रिकेटपटूंचा एमसीएकडून खास सन्मान!

मुंबईची ऐतिहासिक वाटचाल एका भिंतीवर मुंबई: मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) महिला क्रिकेटपटूंना अनोख्या पद्धतीने

...म्हणून मुंबईत वाढला पावसाचा जोर

मुंबई : गणेशोत्सवानंतर काही दिवस पावसाचा जोर एकदम ओसरला होता. पण १२ सप्टेंबरपासून पावसाचा जोर हळू हळू वाढत गेला.

नारळासाठी ४५ रुपयांची फोडणी; आवक घटल्याने मुंबईकरांना भुर्दंड

मुंबई : सण, उत्सव कालावधीत नारळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मुंबईकरांना सध्या या नारळासाठी ४५ ते ५० रुपये मोजावे

नरिमन पॉइंट ते वसईपर्यंत १० मार्गांवर होणार जलवाहतूक

मुंबई : महामुंबईत १० मार्गांवर जलवाहतूक सुरू होणार आहे. याद्वारे नव्या विमानतळाला चार मार्ग जोडले जाणार आहेत.