नाशिकमध्ये सीबीआयची मोठी कारवाई, दोन लाखाची लाच घेतांना पीएफ आयुक्तांसह दोन जण अटकेत

नाशिक (प्रतिनिधी)- नाशिकमध्ये सीबीआयने प्रादेशिक भविष्य निर्वाह निधी आयुक्त आणि अन्य दोन जणांना दोन लाखाच्या लाच प्रकरणात अटक केली आहे. भविष्य निर्वाह निधी आयुक्त, अंमलबजावणी अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीला दोन लाखाची लाच घेताना कारवाई केली आहे. नाशिक (महाराष्ट्र) येथील रहिवासी असलेल्या EPFO अधिकारी आणि एका खासगी व्यक्तीविरुद्ध तक्रारीवरून तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला.


ईपीएफओ अधिकार्‍याने खाजगी पीएफसल्लागारासोबत अवाजवी रक्कम मागण्याचा आणि स्वीकारण्याचा कट रचल्याचा आरोप आहे. तक्रारदाराच्या फर्मशी संबंधित पीएफ प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी दोन लाख ईपीएफओ अधिकाऱ्याने तक्रारदाराला खाजगी पीएफ सल्लागाराला लाच देण्याचे निर्देश दिल्याचा आरोपही करण्यात आला.


सीबीआयने सापळा रचून खासगी व्यक्ती आणि ईपीएफओच्या दोन अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले. नाशिक येथे सात ठिकाणी झडती घेण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम, डायरीसह इतर साहित्य जप्त करण्यात आले. अटक करण्यात आलेल्या आरोपींना आज नाशिक येथील सक्षम न्यायालयात हजर केले असता त्यांना १ जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

Comments
Add Comment

Ganesh Naik : हत्तीसह वन्य प्राण्यांमुळे होणाऱ्या नुकसानाची भरपाई वाढविण्याचा विचार करा

- वनमंत्री गणेश नाईक यांचे निर्देश मुंबई : हत्ती व अन्य वन्यप्राण्यांमुळे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान

Chandrashekhar Bawankule : सातबारावर नाव नसलेले शेतकरी आता शासकीय रेकॉर्डवर येणार

- २.३१ लाख शेतकऱ्यांच्या 'ॲग्रीस्टॅक'चा मार्ग मोकळा; सर्वांना कर्जमाफी आणि शासकीय योजनांचा मिळणार लाभ - मंत्री

SIR : राज्यात अद्यापही १ कोटी ८० लाख ६० हजार मतदार 'एसआयआर'बाहेर

७७ टक्के मतदारांकडून प्रक्रिया पूर्ण; शहरी भागात अनास्था, १७ ऑगस्टला संपणार मुदत मुंबई : देशभरात सुरू असलेल्या

Chandrashekhar Bawankule : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात प्रतिज्ञापत्रांऐवजी स्वयंघोषणापत्राला प्राधान्य

१० सेवांची पुनर्रचना; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्णय मुंबई : दस्तनोंदणी, मुद्रांक विभागात

Viksit Bharat Youth Conclave 2026 : पुण्यात रंगणार ‘विकसित भारत युथ कॉन्क्लेव्ह-2026’; देशभरातील 1,000 युवकांचा सहभाग

मुंबई : महाराष्ट्रासह देशभरातील युवकांना क्रीडा, तंत्रज्ञान, नवोन्मेष, उद्योजकता आणि संस्कृतीच्या माध्यमातून

CSMT : सीएसएमटीच्या प्रत्येक रेल्वेगाडीत ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’च्या उद्घोषणेची मागणी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना पत्र मुंबई : छत्रपती शिवाजी