Priyanka Gandhi : प्रियंका गांधी गोत्यात; आर्थिक घोटाळ्यात ईडीने दाखल केलं नाव

नवी दिल्ली : काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. जमीन घोटाळ्याशी (Land Scam) संबंधित आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी (Financial scam) चार्जशीटमध्ये ईडीने प्रियांका गांधी यांचं नाव नोंदवलं आहे. यामुळे प्रियांका गांधी आणि त्यांचे पती रॉबर्ट वड्रा (Robert Vadra) यांनी दिल्लीच्या एका रिअल इस्टेट एजंटकडून हरयाणात केलेलं भूखंड खरेदी प्रकरण चर्चेत आलं आहे. सीसी थंपी आणि सुमित चड्ढा यांच्या विरोधातील चार्जशीटमध्ये या भूखंड खरेदी - विक्री प्रकरणाचा उल्लेख करण्यात आला आहे.


फरिदाबाद येथील अमीपूर येथे सन २००५-२००६ एचएल पाहवा या प्रॉपर्टी डिलरकडून रॉबर्ट वड्रा यांनी जमीन खरेदी केली होती. ही जवळपास ४०.८ एकर इतकी आहे. ही जमीन २०१० साली पुन्हा पाहवा यांनाच विकण्यात आली होती. याशिवाय प्रियांका गांधी-वाड्रा यांच्या नावानेही जमीन खरेदी करण्यात आली होती. ही जमीन देखील अमीपूर गावातील होती. २००६ मध्ये या जमीनीचा व्यवहार झाला होता. यानंतर २०१० मध्ये ही जमीन देखील विकण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार, पाहवा हे सीसी थंपी यांच्या निकटवर्तीय आहेत. अमीपूरमध्ये थंपी यांनीही जमीन खरेदी केली होती.


ईडीचं या प्रकरणात म्हणणं आहे की, ज्या इस्टेट एजंटकडून प्रियांका आणि रॉबर्ट वड्रा यांनी जमिनीचा खरेदी व्यवहार केला. त्याच एजंटनं एनआरआय बिझनेसमन सीसी थम्पी या व्यक्तीलाही भूखंड विकले आहेत. त्यामुळं वड्रा आणि थम्पी यांचे अनेक काळापासून आर्थिक हितसंबंध आहेत. हे मोठं आर्थिक घोटाळ्याचं प्रकरण आहे. जे हत्यारांचा डिलर फरार संजय भंडारी याच्याशी संबंधित आहे. या प्रकरणात आता प्रियंका गांधीचंही नाव आल्याने त्या गोत्यात येणार आहेत.


ईडीने या प्रकरणाशी संबंधित चार्जशीटमध्ये थम्पीच्या निकटवर्तीय म्हणून रॉबर्ड वड्रा यांचं नाव घेतलं होतं. पण कोर्टात दाखल करण्यात आलेल्या अधिकृत कागदपत्रांमध्ये प्रियांका गांधींच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे यावर काँग्रेस काय भूमिका घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.


सक्तवसुली संचलनालयाने (ED) रॉबर्ट वड्रा यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. लंडन येथे रॉबर्ट वड्रा यांचं घर होतं. एलर्टन हाउस, ब्रायनस्टन स्क्वायर (Ellerton House, Bryanston Square) असं रॉबर्ट वड्रा यांच्या घराचं नाव आहे. वड्रा यांचं हे घर प्रॉपर्टी डिलर संजय भंडारी यांनी २००९ मध्ये खरेदी केलं होतं. त्यानंतर सीसी थंपी यांनी २०१० मध्ये या स्थावर मालमत्तेचा व्यवहार केला होता.


रॉबर्ट वड्रा यांचे निकटवर्तीय संजय भंडारी यांनी केलेल्या आर्थिक गैरव्यवहाराचा तपास सध्या ईडी करत आहे. या तपासातूनच ही माहिती समोर आली आहे. भंडारी याची मनी लॉन्ड्रिंग, परदेशी चलन आणि काळा पैसा कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी गोपनियता अधिनियमांतर्गत अनेक एजन्सीज चौकशी करत आहेत. सन २०१६ मध्ये चौकशीच्या भीतीने तो भारत सोडून ब्रिटनमध्ये स्थायिक झाला आहे.


यामुळे पाहवा, थंपी, संजय भंडारी आणि रॉबर्ट वड्रा यांचे एकमेकांशी आलेले आर्थिक हितसंबंध आणि हरयाणात केलेलं भूखंड खरेदी-विक्री प्रकरण प्रियांका गांधी यांना चांगलंच भोवणार आहे.

Comments
Add Comment

छत्तीसगडमधील सुकमात चकमक, तीन नक्षलवादी ठार

सुकमा : छत्तीसगडमधील सुकमाच्या जंगलात सुरक्षा पथक आणि नक्षलवादी यांच्यात चकमक झाली. या चकमकीत तीन माओवादी

दहशतवादी उमरच्या घरात होता बॉम्ब निर्मितीचा कारखाना

फरिदाबाद : दिल्ली कार स्फोट आणि दहशतवादी उमर यांच्याबाबत नवनवी माहिती हाती येऊ लागली आहे. स्फोट घडवणाऱ्या

तीन दिवसांत 28 काळवीटांचा मृत्यू; कर्नाटक प्राणीसंग्रहालयावर संशयाचे सावट

कर्नाटक : बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर राणी चेन्नम्मा प्राणीसंग्रहालयात गेल्या तीन दिवसांत तब्बल 28 काळवीटांचा

गांधीनगर रेल्वेस्थानकाचा पुनर्विकास आधुनिक सुविधांनी होणार सज्ज

सीमा पवार गांधीनगर : जयपूरमधील गांधीनगर रेल्वेस्थानक लवकरच आधुनिक सुविधांनी सज्ज होणार आहे.‘अमृत भारत स्टेशन

पती संभाळ करत असला तरी आई मुलाकडून पालनपोषण खर्च मागू शकते

केरळ उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय तिरुवनंतपुरम  : पती जिवंत असेल आणि पत्नीचा सांभाळ करत असला तरीही आई

डेस्क, मीटिंग रूम आणि चॅट… ऑफिस अफेअर्समध्ये भारत आघाडीवर

नवी दिल्ली  : भारत ऑफिस रोमॅन्समध्ये जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. एशली मॅडिसन आणि युगोव्हच्या सर्व्हेनुसार ४०