Monday, April 21, 2025
Homeताज्या घडामोडीVD18च्या सेटवर चौथ्यांदा वरूण धवन झाला दुखापतग्रस्त, शेअर केला फोटो

VD18च्या सेटवर चौथ्यांदा वरूण धवन झाला दुखापतग्रस्त, शेअर केला फोटो

मुंबई: अभिनेता वरूण धवन(varun dhawan) सध्या दक्षिणेतील दिग्गज सिने दिग्दर्शक एटली कुमारचा अनटायटल्ड सिनेमा वीडी १८च्या शूटिंगमध्ये बिझी आहे. या सिनेमाची शूटिंग केरळमध्ये सुरू आहे. यातच शूटिंगदरम्यान अभिनेत्याच्या पायाला दुखापत झाली आहे. अभिनेत्याने दुखापतग्रस्त पायाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. वरूण धवन वीडी १८च्या सेटवर चौथ्यांदा दुखापतग्रस्त झाला आहे.

वरूण धवनने नुकतीच इन्स्टाग्रामवर स्टोरीवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. यात त्याचा एक पाय खुर्चीवर दिसत आहे. या पायाला पट्टी बांधलेली आहे. व्हिडिओसह वरूणने कॅप्शनमध्ये लिहिले, शूटिंगवर आणखी एक दिवस…#vd18.

वरूणने ऑगस्ट महिन्यात या सिनेमाचे शूटिंग सुरू केले होते. शूटिंग सुरू झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्याला सेटवर दुखापत झाली होती.

याआधीही झाला होता दुखापतग्रस्त

वीडी १८च्या शूटिंगदरम्यान सप्टेंबरमध्ये वरूण धवनला दुखापत झाली होती. सेटवर वरूणच्या एका पायाला दुखापत झाली होती. यानंतर त्याला बर्फाच्या पाण्याच्या थेरपीचा सल्ला देण्यात आला होता. त्यावेळेस त्याने इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत दुखापतीबाबत भाष्य केले होते. त्याने लिहिले होते, मला वाटते की शूटिंगदरम्यान माझ्या पायाला दुखापत झाली आणि मला नाही माहीत की माझ्या पायाला कसे लागले.

वरूण धवन शेवटचा नितेश तिवारी यांचा सिनेमा बवालमध्ये दिसला होता. सिनेमात त्याच्यासोबत जान्हवी कपूर दिसली होती. वीडी १८शिवाय त्याच्याकडे वेब सीरिज सिटाडेल इंडिया पाईपलाईनमध्ये आहे. वीडी १८ बाबत बोलायचे झाल्यास सिनेमाच्या माध्यमातून तो पहिल्यांदा एटलीसोबत काम करत आहे. याआधी एटलीचा जवान हा सिनेमा आला होता. यात शाहरूख खान मुख्य भूमिकेत होता.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -