अयोध्येत पंतप्रधान मोदींच्या हस्ते विमानतळाचे उद्घाटन आणि रोड शो

अयोध्या : अयोध्येतील राम मंदिराच्या उद्‌घाटनाची जोरदार तयारी सुरू असून त्यापूर्वी ३० डिसेंबरला येथील विमानतळाचेही उद्‌घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. विमानतळाचे उद्‌घाटन झाल्यानंतर मोदी अयोध्येत रोड शो घेणार असून नंतर एक सभाही घेणार आहेत.


राम मंदिराचे उद्‌घाटन पुढील वर्षी २२ जानेवारीला होणार आहे. त्यासाठी अयोध्येचाही कायापालट करण्यात आला आहे. अयोध्येत नवीन विमानतळ उभारण्यात आले असून रेल्वेस्थानकाचाही पुनर्विकास करण्यात आला आहे.


मोदी हे ३० डिसेंबरला अयोध्येत येणार असून यावेळी ते विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांचे उद्‌घाटन करतील. विमानतळ आणि रेल्वेस्थानक यांच्यातील अंतर १५ किलोमीटरचे आहे. विमानतळावरील कार्यक्रम झाल्यावर पंतप्रधान मोदी याच मार्गावरून रोड शो करत रेल्वे स्थानकापर्यंत पोहोचणार असल्याची माहिती अयोध्येचे जिल्हा न्यायदंडाधिकारी नितीशकुमार यांनी सांगितले.


रोड शोच्या मार्गावर विविध ५१ ठिकाणी मंडप उभारून सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. याठिकाणी विविध साधूसंत पंतप्रधानांना आशीर्वाद देतील. रेल्वे स्थानक ते विमानतळ या मार्गावरील पाच किलोमीटरच्या उड्डाणपूलाचे भूमिपूजनही मोदींच्या हस्ते होईल.


रेल्वे स्थानकावर मोदींच्या हस्ते वंदे भारत आणि अमृत भारत या दोन रेल्वेगाड्यांना हिरवा झेंडा दाखविला जाणार आहे. यानंतर मोदी पुन्हा रस्ते मार्गाने विमानतळावर जाणार असून विमानतळाच्या नजीकच आयोजित केलेल्या सभेत सहभाग घेणार आहेत. अयोध्येसाठीचे पहिले विमान दिल्लीहून सकाळी दहा वाजता उड्डाण करून अयोध्येत सकाळी ११ वाजून २० मिनिटांनी पोहोचेल.

Comments
Add Comment

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीच्या मुदतवाढीवर सुप्रीम कोर्टात मंगळवारी सुनावणी

नवी दिल्ली : महाराष्ट्रात बहुप्रतिक्षित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी जानेवारी

'वनतारा'चा मोठा विजय! रिलायन्सच्या ‘वनतारा’ला सर्वोच्च न्यायालयाची ‘क्लीन चिट’

नवी दिल्ली: प्राण्यांच्या खरेदी-विक्रीसंदर्भात कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप असलेल्या रिलायन्स

Railway Ticket Booking : १ ऑक्टोबरपासून बदलणार तिकीट बुकिंगचे नियम, या लोकांना होणार मोठा फायदा

मुंबई: भारतीय रेल्वेने ऑनलाइन तिकीट बुकिंगच्या नियमांमध्ये एक मोठा बदल केला आहे, जो 1 ऑक्टोबर 2025 पासून लागू होणार

रतन टाटांचे TCS कार्यालय बंद होणार! हजारो नोकऱ्या धोक्यात

भोपाळ: टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मध्य प्रदेशातील भोपाळ येथील आपले कार्यालय १३ वर्षांनी बंद करण्याचा

BMW Car Accident: कारच्या धडकेने अर्थ मंत्रालयाच्या अधिकाऱ्याचा मृत्यू, पत्नी गंभीर जखमी

नवी दिल्ली येथे काल रविवारी (१५ सप्टेंबर), अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात उपसचिव म्हणून कार्यरत

वक्फ सुधारणा कायद्यातील निवडक तरतुदींना स्थगिती, जिल्हाधिकाऱ्यांना नसेल निर्णय घेण्याचा अधिकार

नवी दिल्ली : संसदेत याच वर्षी मंजूर झालेल्या वक्फ सुधारणा कायद्यातील काही तरतुदींना सोमवारी सर्वोच्च