दैव जाणिले कुणी...

हलकं-फुलकं: राजश्री वटे

कोणाला आधी माहीत होते कां की, या दोघी... सुलोचना!! इतकं नेत्रदीपक यश गाठणार आहेत... एकीचा भारदस्त आवाज, तर दुसरीचं भारदस्त शालीन सौंदर्य! एक गायिका सुलोचना चव्हाण... दुसरी नायिका सुलोचना लाटकर!
देव जरी मज कधी भेटला (सुलोचना दीदींचे गाणे), तर त्याला हेच विचारणार आहे मी की, या दोन सारख्या नावाच्या दोघीजणींना तू कलेचं भरभरून वरदान दिलंस, दोघी कलाकाराचं आयुष्य भरपूर व भरभरून जगल्या. दोघींनी मराठी सिनेसृष्टीवर राज्य केलं. मराठी रसिकांना मिळालेला सुरमयी सौंदर्याचा खजिनाच गवसला होता जणू!! एकीने चाहत्यांना लावणीतलं अर्थपूर्ण सौंदर्याची ओळख आवाजातल्या नजाकतीमधून करून दिली... तर दुसरीने शालीन, खानदानी, सात्त्विक, सोज्वळ सौंदर्याची ओळख आपल्या अभिनयातून सिनेरसिकांपर्यंत पोहोचवली!


किती साम्य ते दोघींमध्ये... केसांचं वळणसुद्धा सारखं नागमोडी... दोन्ही खांद्यावर पदराची शान... नावापासून दिसण्यापर्यंत एक खानदानी प्रवाह जणू!! आयुष्याची देणगी म्हणजे दोघींनाही सहस्रचंद्र दर्शन घडावे, हेही भाग्य नसे थोडके आणि आश्चर्य म्हणजे दोघींनाही ‘पद्मश्री’ देऊन गौरवण्यात यावे... अहाहा...! हा आपल्या मराठी माणसाचा अभिमान!


मराठी अनेक हळुवार गाणी सुलोचना दीदींवर चित्रित झाली आहेत. पण... ‘नन्ही कली सोने चली, हवा धिरे आना...’ किती गोंडस गाणं! केशरी रंगाचं बाळसेदार गोड फळांच्या राजाचे आगमन होते तेव्हा ‘आला गं... बाई आला गं...’ हे सुलोचनाबाईंचं गाणं ‘आंबा जिभेवर आणि गाणं ओठावर’ अशी स्थिती होते. ‘पाडाला पिकलाय आंबा... निट बघ...’ असा खणखणीत आवाज होणे नाही... तसेच असे सात्त्विक सौंदर्य दिसणे नाही!


हे जुळं कलेचं सौंदर्य लोप पावलं... सहा महिन्यांच्या अंतराने... पण मराठी माणसाच्या तनामनात ते जिवंत राहाणार आहे... तुटली गं स्वप्नमाळ... या आजीवन मराठी रसिकांवर राज्य करणाऱ्या या सम्राज्ञीना मानाचा मुजरा...
एक सुलोचना बाई (चव्हाण)🎼🎼, दुसरी सुलोचना दीदी (लाटकर).🎬..

Comments
Add Comment

दीर्घकालीन युद्धाची सावली

विश्वभ्रमण; प्रा. जयसिंग यादव इराण-अमेरिकेतील संघर्ष केवळ शस्त्रांचा किंवा सामर्थ्याचा नाही, तर राजकारण,

जागतिक जल दिन

मनस्विनी : पूर्णिमा शिंदे पाणी हेच जीवन. थेंबे थेंबे तळे साचे म्हणतात ना अगदी तसं ते साठवलं पाहिजे. आपल्या मुलभूत

मॉर्निंग वॉक बेतला जीवावर

क्राइम : अॅड. रिया करंजकर सकाळचं चालणं हे तब्येतीसाठी चांगलं असतं हे खुद्द डॉक्टर सांगतात आणि लोकही सुदृढ

नैवेद्य

जीवनगंध : पूनम राणे “नववर्षाचा जल्लोष मनी बाळ जन्मला चैत्र गुणी स्वागत करू गुढी उभारूनी कोकिळही गातो गोड

भुकेलेल्यांना अन्न न दिल्यास...

महाभारतातील मोतीकण ; भालचंद्र ठोंबरे पद्म पुराणातील एका कथेनुसार, वनवासात असताना प्रभू श्रीराम एकदा अगस्ती

चिरतरुण...

संवाद ; गुरुनाथ तेंडुलकर अलीकडेच मी एक व्हिडीओ पुन्हा एकदा नव्याने पाहिला. जग‌द्विख्यात गायिका आशा भोसले