कोकणी बाणा: सतीश पाटणकर
मोंड हे भारतातील महाराष्ट्र राज्यातील दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील एक गाव आहे. नयनरम्य मोंड गाव देवगड तालुक्यातील स्वच्छ सुंदर व निसर्गाने नटलेले गाव म्हणून मोंड गावाची ओळख आहे. या गावचे ग्रामदैवत श्री भैराईदेवीच्या आशीर्वादाने येथील गाव गुण्यागोविंदाने नांदत आहे. देवगड तालुक्यातील स्वच्छ सुंदर व निसर्गाने नटलेले गाव म्हणून मोंड गावाची ओळख आहे.
शिवगंगा नाव धारण करत सह्यगिरीतील शिवगडाच्या पायथ्याशी उगम पावत थेट वाड्यापर्यंत पोहोचणाऱ्या शिवगंगा नदीला किनाऱ्यावरील गावांनी आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक जीवनात मोठे स्थान दिले आहे. किनारी भागातील हजारो एकर जमीन क्षेत्र या नदीमुळे समृद्ध तर झालेच. या नदीकिनारी बहरलेली माड बागायती समृद्धतेची आणखी एक झालर पांघरते. गढीताम्हाणे गावातील रहाटेश्वर देवालय प्रसिद्ध आहे. फार पूर्वीच्या काळात या भागातील शिवभक्तांसह रहाटेश्वर देवाला महाशिवरात्रीच्या उत्सवात समुद्रस्नान करता यावे म्हणून ही नदी तीर्थस्थान म्हणून धार्मिक विधींनी उजविण्यात आली. तेव्हापासून येथे शिवरात्रीचे तीर्थस्नान होऊ लागले. एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून या नदीला येथे महत्त्व प्राप्त झाले आहे. वाघेरीचा मोना वहाळ, नाद, ओंबळ नदी, आचिर्णेचा झिरंगेचा वहाळ, शिरगावचा वहाळ, मोंडची नदी अशा पाच नद्या या नदीत विलीन झाल्या आहेत. त्यामुळे पंचनदीचा संगम असलेली ही शिवगंगा नद्यांच्या इतिहासातील महत्त्वाची नदी आहे.
कणकवलीतून शिरवलीमार्गे ही नदी आत शिरते आणि नाद, बागतळवडे, गढीताम्हाणे, तळवडे, वानिवडे, मोंड, वाडातर करून देवगड बंदरात सागराला मिळते. खारी व गोडी या दोन शब्दांतून खारीतला ‘खा’ व गोडीतला ‘डी’ ही दोन अक्षरे घेऊन ‘खाडी’ हा शब्द तयार झाला. शिवगंगा नदीला खाडीचे स्वरूप मोंड गावात प्राप्त होते. म्हणूनच मोंड गावापासूनच पुढे तिला खाडी म्हणून ओळखतात. या मोंड खाडीला देवगडच्या भूगोलात अतिशय महत्त्व आहे, कारण ही एकमेव खाडी देवगडचे दोन भाग करते. नैसर्गिकरीत्या या दोन भागांना जोडण्याचे काम वाडातर पूल करतो. या पूर्वी सागरी महामार्ग मोंड गावातून जात होता. या पुलाच्या बांधकामानंतर हा मार्ग जामसंडे मार्गे वाडातर पडेल, असा वळवण्यात आला. यामुळे हा पूल वाडातरला असूनही मोंड खाडीवरील वाडातर पूल असे नाव देण्यात आले आहे. सागरी महामार्ग वाडातरहून वळल्याने आता मोंडहून जाणाऱ्या मार्गाला ग्रामीण मार्गाचे स्वरूप आले आहे.
मोंड या गावचे ग्रामदैवत श्री भैराईदेवीच्या आशीर्वादाने येथील गाव गुण्यागोविंदाने नांदत आहे. मोंड गावच्या माळरानावर वसलेली माऊली श्री देवी भैराई प्रसिद्ध आहे. मोंड – वाघोटण मार्गावर देवगड तालुक्याच्या एका टोकाला खाडी पलीकडे हे देवीचे पुरातन मंदिर आहे. अतिशय निसर्गसंपन्न असे सडा-माळरान लाभल्याने हे ठिकाण पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास येत आहे. मंदिराचे बांधकाम पुरातन आहे. मंदिराच्या खांबावर केलेले नक्षीकाम ऐतिहासिक वारसा दर्शवते. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये एक फूट खाली जमिनीत पाषाण असलेली देवीची सुंदर मूर्ती मन प्रसन्न करते. बाजूलाच देवीचे तरंगकाठी, पुरातन समई, विविध वाद्ये आहेत. विलोभनीय दृश्य आणि शांत वातावरण हे येथील वैशिष्ट्य आहे.
मंदिर परिसरात पुरातन मंदिराच्या वास्तू आहेत. श्री देव अनुभव, श्री देव ब्राह्मण आणि समोरच श्री देव रामेश्वर, देवी भावई तसेच लेकरांचे रक्षण करणारा बारापाचाचा चौचार अशी विविध मंदिरे बाजूलाच वसलेली आहेत. जवळच बारमाही पाणी देणारी विहीर आहे. पूर्वी या मंदिर परिसरात घनदाट वनराई होती. कालांतराने ही वनराई तोडण्यात आली. या मंदिराबरोबरच गावात सिद्धिविनायकाचे मंदिर असून ६४ कला आणि १४ विद्यांचा प्रणेता व नवसाला पावणारा मोंडचा सिद्धिविनायक म्हणून या गणेशाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. (लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत)
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…