
तैवान: तैवान देश(taiwan) पुन्हा एकदा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. दक्षिण चीन सागरात असलेल्या छोट्या द्वीप तैवानमध्ये भूकंपाचे जबरदस्त धक्के बसले. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती.
जसे जमीन हलण्यास सुरुवात झाली लोकांमध्ये भितीचे वातावरण पसरले. भूकंपाचा केंद्रबिंदू १० किमी खोल आहे. आतापर्यंत भूकंपामुळे कोणत्याही प्रकारची हानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, लोकांना जुन्या इमारतीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जीएफजेड जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसायन्सने सांगितले की रविवारी तैवानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल इतकी होती. तर तैवानच्या हवामान विभागाच्या माहितीनुसार रविवारीच तैवानमध्ये ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के बसले. हवामान विभागाने सांगितले की भूकंपाची तीव्रता कमी असल्याचे मुख्य जमिनीला याचे धक्के बसले नाहीत. भूकंपाचा केंद्रबिंदू तैवानच्या तायतुंग काऊंटी हे होते.
विभागाचे म्हणणे आहे की या भूकंपाची तीव्रता कमी असल्याने काही भाग वगळता येथे झटके जाणवले नाहीत. ग्रामीण भागांमध्ये याचे झटके बसले. भूकंपाचे झटके तैवानची राजधानी तैपेईमध्ये जाणवले नाहीत. खरंतर, तैवान दोन टेक्टोनिक प्लेटोमध्ये आहे. त्यामुळे जेव्हा टेक्टोनिक प्लेटोमध्ये आपापसांत टक्कर होते तेव्हा तैवानमध्ये भूकंपाचे धक्के जाणवतात.