Chunabhatti Firing : मुंबईतील चुनाभट्टीत भरदिवसा गोळीबार; तिघेजण जखमी

Share

स्थानिक गुंड पप्पू येरुणकरवर करण्यात आला हल्ला

मुंबई : मुंबईतील चुनाभट्टीसारख्या गजबजलेल्या परिसरात भरदिवसा गोळीबाराची (Chunabhatti Firing) घटना घडली आहे. परिसरातील स्थानिक गुंड असलेल्या पप्पू येरुणकर (Pappu Yerunkar) आणि त्याच्या दोन ते तीन साथीदारांवर गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या ओपन गोळीबारात पप्पू येरुणकरसह तीन जण जखमी झाले आहेत.

चुनाभट्टी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आझाद गली, व्हीएन पूर्वा मार्ग येथे दुपारी साडेतीनच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. यावेळी १६ राऊंड फायर करण्यात आले. अंतर्गत वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे समजत आहे. यामध्ये जखमी झालेल्या तिघांना सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर घटनास्थळी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

पप्पू येरुणकर हा स्थानिक गुंड असून त्याच्यावर आतापर्यंत विविध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याआधी त्याने जेलची हवाही खाल्ली आहे. तसेच त्याचे अनेक लोकांसोबत जुने वाद आहेत. त्यातून त्याच्यावर हल्ला करण्यात आला असावा असा पोलिसांना संशय आहे. मात्र, नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही.

ज्या ठिकाणी हा हल्ला झाला ते ठिकाण अत्यंत गजबजलेलं आहे. या परिसरात अनेक दुकानं असून त्या ठिकाणच्या सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलीस तपास करत आहेत. मात्र दिवसा ढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे चुनाभट्टी परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

Recent Posts

वाळवंटातील बांधकाम क्षेत्रात अब्दुल्ला अ‍ॅण्ड असोसिएट्स

शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…

45 minutes ago

भारतासाठी कंटेंट हब बनण्याची सुवर्णसंधी!

वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…

50 minutes ago

काश्मीरची ढगफुटी : मानवजातीला इशारा

काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…

57 minutes ago

Daily horoscope : दैनंदिन राशीभविष्य, मंगळवार, २२ एप्रिल २०२५

पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…

1 hour ago

Mhada House : सर्वसामान्यांना मिळणार स्वस्तात घर! म्हाडा करणार घरांच्या किंमतीत घट

किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…

1 hour ago

Pune News : पुण्यातील गुन्हेगारीला बसणार चाप! पोलिसांचा मोठा निर्णय

पुणे : विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक राजधानी नंतर क्राइम शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या पुणे शहरात…

1 hour ago