Salaar Movie : नेहमीप्रमाणे प्रभासचा 'सालार'ही प्रदर्शित होताच झाला ऑनलाईन लीक!

  104

तरीही करणार भरघोस कमाई...


मुंबई : बिग बजेट सिनेमा (Big Budget Cinema) प्रदर्शित झाल्या झाल्या तो अनधिकृत साईट्सवरुन (Unofficial sites) लीक होणे ही काही नवीन गोष्ट राहिलेली नाही. नुकताच प्रदर्शित झालेला 'अ‍ॅनिमल' (Animal) सिनेमाही लगेच लीक झाला होता, मात्र तरीही या सिनेमाने ५०० कोटींचा पल्ला गाठलाच. तर शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) पठाण, जवान या सिनेमांनीही ऑनलाईन लीक (Online leak) होण्याच्या प्रकाराला सामोरे जावे लागले होते. असं असलं तरी चाहते मात्र निर्मात्यांची निराशा करत नाहीत. सिनेमा लीक झाला तरी अनेक चाहते तो चित्रपटगृहात जाऊनच पाहतात. त्यामुळे बिग बजेट सिनेमा बजेटपेक्षा जास्त कमाई करण्यात यशस्वी होतो.


दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा (Prabhas) बहुचर्चित सिनेमा 'सालार' (Salaar) आज प्रदर्शित झाला. सिनेमा प्रदर्शित होण्याआधीच या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्येही (Advanced Booking) बाजी मारली होती. तब्बल ४०० कोटींचं बजेट असणारा हा सिनेमा आहे. कलाकारांनीही तितकंच तगडं मानधन घेतलं आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता 'सालार' प्रदर्शानानंतर काही तासांतच ऑनलाईन लीक झाला.


'सालार'चं एचडी व्हर्जन तमिळ रॉकर्स, फिल्मीझिला, टेलिग्राम अशा आणखी काही पायरसी साइट्सवर लीक झालं आहे. तरीही सिनेमाचा प्रतिसाद पाहता पहिल्या दिवशी हा सिनेमा ३५ ते ४० कोटींची कमाई करेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 'सालार' सिनेमा हिंदी, तमिळ, कन्नड, मल्याळम आणि तेलुगु भाषांमध्ये प्रदर्शित झाला आहे. 'सालार'बरोबरच शाहरुख खानचा 'डंकी'देखील ऑनलाइन लीक झाला आहे.

Comments
Add Comment

Operation Akhal: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून चकमक सुरू, आतापर्यंत ३ दहशतवादी ठार; २ दहशतवाद्यांना घेराव

कुलगाम: जम्मू-काश्मीरमधील कुलगाममध्ये ३ दिवसांपासून लष्कराचे ऑपरेशन अखल सुरू आहे. याद्वारे एके-४७ रायफल, एके

लष्करी अधिकाऱ्याकडून स्पाइसजेटच्या कर्मचाऱ्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण, श्रीनगर विमानतळावर नेमके घडले काय?

एका कर्मचाऱ्याच्या पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर आणि जबड्याला गंभीर दुखापत श्रीनगर: जम्मू काश्मीरमधील श्रीनगर

‘इस्राो’ची मंगळ तयारी

नवी दिल्ली : ३१ जुलै रोजी इस्रोने लडाखच्या त्सो कार या दुर्गम आणि मंगळ ग्रहासारख्या भासणाऱ्या प्रदेशात आपल्या

सैन्याच्या शौर्याचा काँग्रेसकडून सतत अपमान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीत आरोप वाराणसी  : ऑपरेशन सिंदूर पूर्णपणे यशस्वी झाले आहे, पहलगामचे

पाकिस्तानमधून आरडीएक्सने राम मंदिर उडवण्याचा मेसेज; गुन्हा दाखल

बीड : उत्तर प्रदेशातील अयोध्येतील श्री राम मंदिर उडवण्याचा मेसेज थेट पाकिस्तानातून बीड जिल्ह्यातील एका तरुणाला

इंडिगोच्या विमानात कानशिलात! पॅनिक अटॅक आलेला तरुण बेपत्ता!

मुंबई : मुंबईहून कोलकात्याकडे जाणाऱ्या इंडिगो एअरलाईन्सच्या फ्लाइटमध्ये एक धक्कादायक घटना घडली. पॅनिक अटॅकचा