श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या(jammu-kashmir) पूंछ जिल्ह्यात दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गुरूवारी हल्ला केला. दहशतवाद्यांनी लष्कराच्या ट्रकवर गोळीबार केला. यात तीन जवान शहीद झाले आहेत तर तीन जवान जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, अधिकाऱ्यांनी लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबाराच्या वृत्ताला दुजोरा दिला. राजौरीच्या थानामंडीच्या डेरा की गलीमध्ये २० डिसेंबरच्या रात्रीपासून ऑपरेशन सुरू होते. २१ डिसेंबरच्या दुपारी ३.४५ मिनिटांनी लष्कराच्या दोन गाड्या जेव्हा सैन्याला घेऊन ऑपरेशन एरियामध्ये जात होते तेव्हा दहशतवाद्यांनी गोळीबार केला. दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराच्या जवानांनी याला प्रत्युत्तर दिले.
अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार थानामंडी-सूरनकोट रोडवर सावनी परिसरात लष्कराच्या वाहनावर हल्ला झाला. त्यांनी सांगितले, हे वाहन बुफलियाज येथून लष्कराच्या जवानांना घेऊन जात होते. बुफलियाजमध्ये दहशतवाद्यांविरोधात घेराबंदी तसेच तपास अभियान बुधवारपासून सुरू आहे.
लष्कराच्या एका प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार या परिसरात चकमक सुरू आहे. अतिरिक्त जवानांना घटनास्थळी पाठवले जात आहे.
कोलकाता : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून पश्चिम बंगालमध्ये उसळलेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि सुप्रसिद्धी अभिनेता मिथुन…
नाशकात दुपारी १ ते ४ दरम्यान ट्रॅफिक सिग्नल राहणार बंद; प्रशासनाचा मोठा निर्णय! नाशिक :…
नेटकऱ्यांनी केला कमेंट्सचा पाऊस मुंबई: सध्या मराठी कलाविश्वात सई ताम्हणकरच्या ‘आलेच मी’ या लावणीची जोरदार…
बीड : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बीड जिल्ह्याला हक्काचे पाणी मिळवून देण्याचे तसेच गहिनीनाथ गडाला…
निरोगी त्वचा असणे ही सर्वांचीच इच्छा असते. मात्र, निरोगी आणि सुंदर दिसणाऱ्या त्वचेची योग्य काळजी…
पुणे : चितळे प्रकरण ताजे असतानाच पुण्यामध्ये ब्रँडेड कंपन्यांच्या नावे बनावट कपडे विकल्याची माहिती समोर…