मंगल प्रभात लोढा विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंना भिडले, केले खुले आव्हान

Share

आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा, असे म्हणत लोढांनी कोऱ्या कागदावर सही करत दिला राजीनामा

नागपूर : विधान परिषदेतील (Vidhan Parishad) विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी मंत्री आणि भाजप आमदार मंगलप्रभात लोढा (MangalPrabhat Lodha) यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला. यानंतर मंगलप्रभात लोढा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. मंगलप्रभात लोढा यांनी सभागृहात थेट कोऱ्या कागदावर सही करून राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. आपण कोणत्याही प्रकारचे चुकीचे काम करत नसल्याचे तसेच जर आरोप करायचे असतील तर पुरावे सादर करा, असे जाहीर आव्हान लोढा यांनी दिले आहे.

अंबादास दानवे यांनी देखील आपण पुरावे सादर करत असल्याचे जाहीर करत, प्रतिआव्हान दिले. यावर विधान परिषद उपसभापती नीलम गोऱ्हे म्हणाल्या, कुणी राजीनामा बाहेर काढत नाही, पण लोढासाहेब तुम्ही राजीनामा बाहेर काढलात. तुम्ही राजीनामा देवू नका. तसेच काही आमदार केवळ खिशात राजीनामा घेऊन फिरतात, मात्र कुणीच राजीनामा देत नाही, असा टोमणाही लगावला.

अंबादास दानवे म्हणाले, “मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्याबाबत अनेक तक्रारी आहेत. कुणाच्याही जमिनी घ्यायच्या. मुंबईत जमिनी, ठाणे, कल्याण, भिवंडीत जमिनी घेतल्या”, असे अंबादास दानवे म्हणाले. यानंतर लोढा यांचे नाव आपण मागे घेत असल्याचे दानवे म्हणाले. पण लोढा यांचे नाव न घेता, दानवे यांनी त्यांचा मुंबईचे पालकमंत्री असा उल्लेख करत, आरोपांच्या फैरी चालूच ठेवल्या.

दानवे म्हणाले, “भाजपचे एक नेते, मुंबईचे पालकमंत्री यांचे अनेक ठिकाणी महापालिकेने अवैध बांधकाम, त्याची विक्री चालू आहे. भाजप उघड्या डोळ्याने हे बघत आहे. त्यांच्याविरोधात आमच्याकडे तक्रारी येत आहेत त्या तक्रारी मी तुमच्याकडे पाठवतो तुम्ही याबाबत निर्णय घ्या”, असे दानवे उपसभापती नीलम गोऱ्हेंना म्हणाले.

अंबादास दानवेंनी आरोप केल्यावर मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत राजीनाम्याचे पत्र काढले. तसेच १० वर्षांपासून मी माझ्या कुटुंबाच्या व्यवसायात नाही. जर माझ्या कुटुंबियांकडून अवैध व्यवसाय होत असेल तर मी कोऱ्या चिठ्ठीवर राजीनामा लिहून आणला आहे. एकही अनधिकृत बांधकाम केलेले नाही. आम्ही अनधिकृत व्यवसाय करत नाही. पदाचा मी गैरवापर करत नाही, असे मंगलप्रभात लोढा म्हणाले.

यावर “मंगल प्रभात लोढा तुम्ही राजीनामा देऊ नका. अंबादास दानवे यांचे जे आरोप आहेत ते संबंधित यंत्रणेला पुरावे सादर करतील,” असे नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

Recent Posts

धक्कादायक! हा अपघात की अनास्थेचा मृत्यू? उन्हाळी शिबिरांची जबाबदारी नक्की कोण घेणार? आणि मृत्यूचे मोल कोण मोजणार?

जलतरण शिकतानाच ११ वर्षांच्या मुलाचा बुडून मृत्यू; क्रीडा संकुल व्यवस्थापनावर गुन्हा दाखल भायंदर : उन्हाळी…

15 minutes ago

चर्चकडून पगार न घेणारे, पाच लक्झरी कारसह १३७ कोटींच्या संपत्तीचे मालक होते पोप फ्रान्सिस

व्हॅटिकन सिटी : श्वसनाच्या आजाराने त्रस्त असलेल्या पोप फ्रान्सिस यांचे ८८ व्या वर्षी निधन झाले.…

19 minutes ago

Shivneri Fort : शिवनेरी किल्ल्यावर मधमाशांचा पाचव्यांदा पर्यटकांवर हल्ला!

पुणे : शिवनेरी किल्ल्यावर पुन्हा एकदा पर्यटकांवर मधमाशांनी हल्लाबोल केला आहे. या हल्ल्यात १६ जण…

26 minutes ago

पोप फ्रान्सिस ८८ व्या वर्षी ख्रिस्तवासी

व्हॅटिकन सिटी : रोमन कॅथलिक चर्चचे २६६ वे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांचे सोमवारी ८८…

1 hour ago

Beautiful Anklets : चांदीच्या अँकलेटचे सुंदर ८ डिझाईन्स पहा!

महिलांना त्यांच्या पायांचे सौंदर्य वाढवण्यासाठी अँकलेट परिधान करायला फार आवडते. विवाहित महिलांसोबतच अविवाहित मुलींनाही अँकलेट…

1 hour ago

Devmanus Film : ‘देवमाणूस’ चित्रपटातील ’सोबती’ गाणे प्रदर्शित

मुंबई : लव रंजन आणि अंकुर गर्ग यांच्या लव फिल्म्सने ‘देवमाणूस’मधून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केले…

2 hours ago