नाशिक : नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेत औचित्याच्या मुद्द्याद्वारे पत्रकारांच्या विविध प्रश्नां बाबत थेट विधान परिषदेत प्रश्न मांडून आवाज उठवल्याबद्दल युवक आमदार सत्यजित तांबे यांचे नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव, नंदुरबार, मुंबई, पुणे, नागपूर, जिल्ह्यातील सर्व पत्रकारांसह राज्यभरातील विविध पत्रकार संघटनांनी अभिनंदन आ. तांबे यांचे केले आहे.
आमदार सत्यजित तांबे मागणी करताना म्हणाले की, पत्रकारांच्या अनेक मागण्या असून त्या अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. विविध मागण्यांसाठी पत्रकारांनी सातत्याने प्रयत्न केला आहे. मात्र अद्यापही ठोस कार्यवाही झाली नाही. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळ असावे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यातील डिजिटल पत्रकार नियमावली असावी. सातत्याने धावपळ करत असलेल्या पत्रकारांचे नेहमी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होत असते. याचबरोबर कुटुंबाकडेही दुर्लक्ष होत असते .धावपळ करणारा हा लोकशाहीचा आधारस्तंभ कायम उपेक्षित राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या विविध प्रश्नांकडे शासनाने अत्यंत गांभीर्यपूर्वक पाहून प्रश्न मार्गी लावले पाहिजे. याकरता राज्यातील पत्रकारांच्या विविध पत्रकार संघटनांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.त्यामुळे लवकरात लवकर या सर्व संघटनांच्या एक -एक प्रतिनिधी बरोबर बैठक घेऊन त्यांचे प्रश्न त्वरित सोडवावेत, अशी आग्रही मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी विधान परिषदेत केली आहे.
यावर सभापती नामदार नीलम गो-हे यांनी सांगितले की, पत्रकारांच्या प्रश्नाबाबत मागील अधिवेशनात मंत्री शंभूराज देसाई यांना अभ्यास समितीचा अहवाल डिसेंबरच्या अधिवेशनापर्यंत द्या अशा सूचना केल्या होत्या. या अहवालाचा सारांश मागवला जाईल. युवक आमदार सत्यजित तांबे यांनी पत्रकारांसाठी मांडलेला प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असून विविध पत्रकार संघटना व डिजिटल मीडियाच्या बाबत माहिती संचालनालय व संघटना यांच्या सूचना नोंदणीसाठी मागून घ्याव्यात व याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेऊन अर्थसंकल्पामध्ये याबाबत तरतूद करावी अशी सूचना केली.यावर सभागृहात उपस्थित असलेले मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी जानेवारी महिन्यात पत्रकारांच्या प्रश्नाबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक घेण्याचा शब्द वरिष्ठ सभागृहाला दिला.
बारामुला : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे अतिरेक्यांनी पर्यटकांना लक्ष्य करुन गोळीबार केला. या हल्ल्यात २६…
मुंबई: सध्या सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. काश्मीर खोऱ्यातील पहलगाम (Pahalgam Terror Attack) येथे दहशतवाद्यांनी…
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…