Tanuja hospitalised: अभिनेत्री तनुजा रुग्णालयात दाखल, काजोलच्या आईची तब्येत बिघडली

मुंबई: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री तनुजा(Actress tanuja) यांची तब्येत बिघडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार त्यांना जुहूच्या हॉस्पिटलमध्ये आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. डॉक्टरांच्या निगराणीखाली ८० वर्षीय अभिनेत्रीवर उपचार सुरू आहेत. तनुजा यांची तब्येत बिघडल्याने कुटुंबियांनी रविवारी संध्याकाळी त्यांना अॅडमिट केले होते.


तनुजा यांना जुहूच्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले आहे. पीटीआयच्या माहितीनुसार त्यांना वाढत्या वयाशी संबंधित त्रासांमुळे दाखल करण्यात आले होते. तनुजाची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यातयेत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार काळजीची गरज नाही. काजोल, तनिषा, अजय देवगण हे अभिनेत्रीच्या उपचारावर नजर ठेवून आहेत.


तनुजा यांचा जन्म २३ सप्टेंबर १९४३ला मुंबईमध्ये झाला होता. मराठी कुटुंबात जन्मलेल्या तनुजा या सिनेनिर्माता कुमार सेन आणि अभिनेत्री शोभना समर्थ यांच्या मुलगी आहेत. तनुजा यांनी १९७३मध्ये सिनेनिर्माता शोमू मुखर्जी यांच्या लग्न केले होते. त्यांना दोन मुली आहेत काजोल आणि तनिषा मुखर्जी. १९५०मध्ये छबीलीमधून त्यांनी पदार्पण केले होते.


तनुजाच्या बिघडलेल्या तब्येतीमुळे त्यांचे चाहते आणि शुभचिंतक तणावात आहे. त्याच्या तब्येतीच्या पुढील अपडेटची ते वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

दिवाळीनंतर तीन टप्प्यात होणार राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ?

मुंबई : महाराष्ट्रात दिवाळीनंतर तीन टप्प्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील. राज्य निवडणूक आयोग

वांद्र्यातील स्कायवॉक वर्षअखेर होणार सुरू

अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगरांकडून कामांची पाहणी मुंबई (खास प्रतिनिधी): वांद्रे रेल्वे स्थानक ते महाराष्ट्र

मुंबई-कोकण ‘रो-रो’ फेरी सेवेला दसऱ्याचा मुहूर्त!

सागरी महामंडळाने कसली कंबर मुंबई : गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चेत असलेली कोकणातील रो-रो सेवा सुरू होण्याचा

Rain Update: मुंबईसह राज्यात पावसाची शक्यता; मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह सरी

मुंबई: भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस महाराष्ट्रातील विविध भागांत पावसाची

राज्यातील डॉक्टर आज संपावर !

मुंबई (प्रतिनिधी) : आधुनिक औषधशास्त्र प्रमाणपत्र अभ्यासक्रम (सीसीएमपी) पूर्ण केलेल्या

स्व. मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक

मुंबई: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पत्नी स्व. मीनाताई ठाकरे यांच्या दादर येथील