मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक जीव नामशेष केलेत आणि त्यातीलच हा एक “डोडो”. डोडोचा अर्थ पोर्तुगालमध्ये मूर्ख, बावळट. पण आध्यात्मिक अर्थ प्रेमपूर्वक विचार, प्रेमळ संबंध. याचाच अर्थ हे खूप प्रेमळ पक्षी होते. टर्की आणि कबुतर यांचे हे मिश्रण. डोडो हे मॉरिशसच्या जंगलात राहणारे पक्षी आहेत.
आफ्रिकेच्या जवळ मेडागास्करच्या पूर्वेला हिंदू महासागरामध्ये मॉरिशस नावाचे एक स्वर्गीय सुंदर बेट आहे. हिरवंगार मखमली, विविध वनस्पतींनी व्यापलेलं समुद्रातील लहानसं बेट. भौगोलिक स्थिती पाहता हे बेट ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे तयार झाले. आता येथील ज्वालामुखी सक्रिय नाही. मॉरिशसचे एकूण क्षेत्रफळ २,०४० चौ. किमी. आहे. येथील हवामान उष्णकटिबंधीय आहे. येथे उष्ण-दमट-ओला उन्हाळा, कोरडा हिवाळा आणि मे ते सप्टेंबर या काळात चक्रीवादळाचा प्रभाव असतो. या बेटावर निसर्गसौंदर्य ओतप्रोत भरलेले आहे.
१५०७ मध्ये पोर्तुगीज नावाडी या निर्जन बेटावर प्रथम आले, नंतर ते निघून गेले. १५९८ मध्ये तीन डचांची बोट चक्रीवादळात रस्ता चुकून येथे पोहोचली. खरा या बेटाचा शोध यांनीच लावला. नासावच्या प्रिन्स मॉरिसच्या सन्मानार्थ या बेटाचे नाव ‘मॉरिस डी नाऊस’ ठेवले. १६६८ मध्ये डच येथे कायमस्वरूपी वास्तव्य करण्यासाठी आले; परंतु कालांतराने या बेटावर येणाऱ्या पावसामुळे आणि चक्रीवादळामुळे त्यांनी हे बेट सोडले. त्यानंतर बरीच काही आक्रमणे झाली. हिंदूंना गुलाम म्हणून आणण्यात आले. सरतेशेवटी ब्रिटिश शासनापासून १९६८ मध्ये हे बेट स्वतंत्र झाले. कायमस्वरूपी येथे हिंदू आणि आफ्रिकी स्थायिक झालेत.
या जीवसृष्टीतील मानव सोडून अनेक जीव नामशेष झाले आहेत. मॉरिशस बेटाच्या आसपासच ४९ निर्जन बेट आहेत. जे नामशेष प्रजाती असलेले आणि प्राकृतिक संपत्ती म्हणून घोषित केलेले आहेत. मानवाची उत्क्रांती झाली; परंतु मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठी अनेक जीव नामशेष केलेत आणि त्यातीलच हा एक “डोडो”. डोडोचा अर्थ पोर्तुगालमध्ये मूर्ख, बावळट. पण आध्यात्मिक अर्थ प्रेमपूर्वक विचार, प्रेमळ संबंध. याचाच अर्थ हे खूप प्रेमळ पक्षी होते. निकोबार कबुतर हा डोडोचा सर्वात जवळचा नातेवाईक. टर्की आणि कबुतर यांचं मिश्रण. डोडो हे मॉरिशसच्या जंगलात राहणारे पक्षी आहेत. पिवळसर तपकिरी रंगाची पुढच्या बाजूने किंचितशी बाकदार भक्कम चोच. चोचीच्या मागचा डोळ्यापर्यंतचा आणि डोक्याचा अर्धा भाग राखाडी रंगाचा, उरलेला मागील डोक्याचा पांढरट तपकिरी पिसांचा भाग, यांच्या नाकपुड्यांचे छिद्र चोचीपर्यंत गेलेले दिसते. थोडा बदकांसारखा आकार, बदकाच्या पिल्लांसारखे छोटेसे पंख, पिवळसर पाय, अंगावर पांढरट तपकिरी राखाडी कुरळ्या पंखांचे मिश्रण असे याचे वर्णन मिळते. यांची उंची तीन फूट. २१ किलो यांच वजन असावं आणि ऋतूनुसार यांच्या वजनात चढ-उतार होत असावेत.
यांच्या एकंदरीत वर्णनानुसार यांचे स्वभाववैशिष्ट्य आपल्याला लगेच समजते. नैसर्गिक संपत्तीने परिपूर्ण अशा या बेटावर डोडोना सहज आणि पौष्टिक आहार मिळत होता. त्यामुळे एकतर अतिवजनामुळे हे पक्षी उडत नसावेत आणि हळूहळू कालांतराने यांचे पंख लहान झालेत. परिणामी ते वजनदार आणि आळशी झालेत. त्यांची शिकार करणारा कोणताही प्राणी तिथे नसावा, तेव्हा त्यांना स्वतःचे संरक्षण करण्याची कधी गरजच भासली नाही. त्यामुळे ते आरामात राहू लागले म्हणून यांचा स्वभाव शांत, ताकतवर पण आळशी, मनमिळावू, निर्धास्त, मानसिक प्रतिकारशक्ती नसणारा, अतिविश्वासू, नि:स्वार्थी असा झाला. कारण त्यांना जगातल्या कुठल्याही दुर्गुणांचा स्पर्श झालाच नाही. या निरपराध डोडोचा इथेच घात झाला. म्हणूनच म्हणते की, डोडो हा मूर्ख नव्हता, तर “शुद्ध मनाचा” होता.
जेव्हा हे बेट तयार झाले, तेव्हा एकही प्राणी तेथे नव्हता. वैज्ञानिकांच्या मतानुसार कबुतर हा पक्षी येथे स्थलांतर करीत आला असावा. येथील अन्न, निवारा आणि संरक्षण यामुळे त्याचे वजन वाढून डोडोची निर्मिती झाली असावी. या बेटावरील हा एकमेव पक्षी. कबुतरापासून डोडोपर्यंत पोहोचण्यासाठी त्याला लाखो वर्षं लागली असावीत. विज्ञानानुसार एका जातीतील कोणत्याही जीवात अतिखाण्यामुळे बदल होऊ शकतो. या डोडोच्या शरीररचनेत दिवसेंदिवस बदल होऊन ते वातावरणानुसार निर्मित झालेत. येथे खूप मोठी फळे असल्यामुळे त्यांच्या चोचींचे आकारही तसेच पूरक झालेत. यांचा आहार म्हणजे फळे, मासे, बिया. मांसाहारी आणि शाकाहारी असा होता. या पक्ष्यांचे जीवन सुखकर होते, कारण ते पूर्णपणे संरक्षित होते. यांची शिकार होण्याचा संबंधच नव्हता. त्यामुळे हे पक्षी खाऊन पिऊन आरामात राहत होते. यांची शारीरिक ताकद कितीही असली तरी युद्ध करण्याची क्षमता त्यांच्यात नव्हती. किंबहुना स्वतःला संरक्षित करण्यासाठीच्या क्लृप्त्याच नव्हत्या. त्यामुळे ते सहज डचांचे शिकार होत गेले. अतिवजनामुळे उडत नव्हतेच. उत्क्रांती नियमानुसार त्यांचे पंखसुद्धा लहान होत गेले. लाखो वर्षं एकटेच राहिल्यामुळे त्यांना मानवी स्वभावाचा गंधच नव्हता. जेव्हा डच येथे आले, तेव्हा त्यांनी प्रथम डोडोला पाहिले. त्याच्या मंद स्वभावामुळे हा सहज त्यांची शिकार होऊ लागला. १६६२ पर्यंत पूर्ण नामशेष झाला. म्हणजे ७० वर्षांच्या आत हा पक्षी डचांनी शिकार करून नामशेष केला. ते बिचारे स्वतःहूनच स्वतःचा बळी होऊ लागले, कारण ते मानवाला पाहून भयभीत होऊन पळतच नव्हते. त्यामुळे ते खूप सहज शिकार झाले. दुसरे कारण डचांनी कुत्रे, मांजरी, माकडे, डुक्कर यासारखे प्राणी आणून या बेटावर सोडले. त्यामुळे त्या प्राण्यांचे अन्न म्हणून त्यांची शिकार हे डोडो होऊ लागले. शिवाय डचांनी खूप वृक्षतोड सुद्धा केली. त्यामुळे अन्न आणि निवारा दोन्हीला डोडो मुकलेत. थोडक्यात काय तर डचांनी नैसर्गिक संपत्तीची हानी प्रमाणाच्या बाहेर केली.
आता नामशेष डोडोचे पुनर्जीवन करण्यासाठी वैज्ञानिक प्रयत्नात आहेत. परमेश्वरी ऊर्जेने झालेली ही नैसर्गिक संपत्ती, तिचे संरक्षण आणि संवर्धन करणारा एक महत्त्वाचा घटक म्हणजे पक्षी. या जीवसृष्टीतील कोणताही जीव हा मानवनिर्मित ऊर्जेने तयार होईल का? कितीही नवीन टेक्नॉलॉजी आली तरीही ती मानवनिर्मित असणार आहे, परमेश्वरनिर्मित नाही.
dr.mahalaxmiwankhedkar@gmail.com
मुंबई(ज्ञानेश सावंत):मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना हैदराबादमध्ये राजीव गांधी इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम येथे…
अतिधोकादायक उपकरप्राप्त इमारतींची संख्या ९५ वर मुंबई (प्रतिनिधी) : दक्षिण मुंबईतील अंदाने १४ हजार इमारतीची…
पालकमंत्री नितेश राणे यांनी जिल्हा नियोजनमधून २ कोटी ३७ लाख दिला निधी सिंधुदुर्ग (प्रतिनिधी) :…
नवी दिल्ली: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात भारतीय नौदलाचे एक अधिकारी आणि आयबीच्या एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला…
नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सौदी अरेबियाचा…
पहलगाम: जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवाद्यांच्या गोळीबारात महाराष्ट्रातील चार पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. त्यात डोंबिवलीच्या…