Tuesday, October 8, 2024
Homeक्रीडाIND vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा निर्णय चुकला; ११६...

IND vs SA 1st ODI : दक्षिण आफ्रिकेचा फलंदाजीचा निर्णय चुकला; ११६ धावांतच झाले गार!

भारतासमोर आता केवळ ११७ धावांचे आव्हान

जोहान्सबर्ग : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात जोहान्सबर्ग येथे खेळल्या जात असलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात (India vs South Africa 1st ODI) यजमान कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, भारताचे फलंदाज अर्शदीप सिंग (Arshdeep Singh) व आवेश खान (Avesh Khan) यांनी दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. भारतीय गोलंदाजांनी जोहान्सबर्गच्या खेळपट्टीवर दबदबा राखला. अर्शदीपने पाच विकेट्स घेतल्या आणि आवेशने चार विकेट्स घेत आफ्रिकेचा डाव ११६ धावांवर गुंडाळला.

के.एल. राहुल (K. L. Rahul) भारताचा एकदिवसीय संघाचा कर्णधार आहे. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली. तर दक्षिण आफ्रिकेकडून रीझा हेंड्रिक्स आणि डी जॉर्जी ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी आली होती. पहिल्याच षटकात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने भारताला चांगली सुरुवात करून दिली. अर्शदीपने सलामीवीर रीझा हेंड्रिक्सला क्लीन बोल्ड केले. हेंड्रिक्सला खातेही उघडता आले नाही. यानंतर पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने रॅसी-व्हॅन-डर डुसेनला पायचीत बाद केले. त्याला खातेही उघडता आले नाही. मात्र, अर्शदीपची हॅट्ट्रिकची संधी हुकली.

५२ धावांवर दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये परतला होता. अर्शदीप सिंग आणि आवेश खान यांनी अफलातून गोलंदाजी करताना प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या. अर्शदीपप्रमाणे ११ व्या षटकात आवेश खानची हॅटट्रिक हुकली. त्याने पहिल्या दोन चेंडूंवर एडन मार्कराम आणि व्हियान मुल्डरला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. मात्र, तिसऱ्या चेंडूवर अँडिले फेहलुकवायोने बचाव केल्याने त्याला विकेट मिळवता आली नाही.

दक्षिण आफ्रिकेला १३व्या षटकात ५८ धावांवर सातवा धक्का बसला. आवेश खानने डेव्हिड मिलरला यष्टिरक्षक राहुलकरवी झेलबाद केले. मिलरला फक्त दोन धावा करता आल्या. मिलर बाद होताच केशव महाराजलाही फारसे काही करता आले नाही. ऋतुराज गायकवाडकरवी तो झेलबाद झाला. अर्शदीपने २६व्या षटकात पाचवी विकेट घेतली. तर, कुलदीपने शेवटची विकेट घेतली. आवेश पाच विकेट्स घेऊ शकला नाही. भारतीय गोलंदाजांच्या या दमदार कामगिरीमुळे दक्षिण आफ्रिकन संघ केवळ ११६ धावांची कामगिरी करु शकला आहे. भारत या सामन्यात आता आपली जादू दाखवणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -