Prabhas in Salaar : 'सालार' चित्रपटासाठी प्रभासने २०-३० नव्हे तर घेतले तब्बल 'इतक्या' कोटींचे मानधन!

दिग्दर्शकानेही घेतलाय चांगलाच पैसा


मुंबई : 'बाहुबली' (Bahubali) या सिनेमातून खरी ओळख मिळालेला दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या भरभरुन कमाई करत आहे. एक सौ एक हिट सिनेमे बाहुबलीनंतर त्याच्या वाट्याला आले. त्याने 'राधेश्याम', 'साहो', 'आदिपुरुष' अशा सिनेमांतून बक्कळ कमाई केली. आता त्याचा आगामी सिनेमा 'सालार'ची (Salaar) चाहत्यांना प्रचंड उत्सुकता आहे. मात्र, या सिनेमासाठी प्रभासने घेतलेलं मानधन ऐकून तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसेल. 'सालार'साठी प्रभासने तब्बल १०० कोटी रुपये इतकं मानधन घेतलं आहे. शिवाय सिनेमाच्या यशातले १० टक्केही तो घेणार आहे. हा बिग बजेट सिनेमा चाहत्यांनाही नक्कीच सिनेमागृहात खेचून आणणार आहे.


केवळ प्रभासच नव्हे तर सालारच्या संपूर्ण स्टारकास्टने यासाठी तगडं मानधन स्विकारलं आहे. या सिनेमात मुख्य नायिका साकारणारी श्रुती हसनने (Shruti Hasan) मात्र प्रभासच्या तुलनेत फारच कमी मानधन घेतलं आहे. या चित्रपटासाठी तिला ८ कोटी रुपयांचं मानधन देण्यात आलं आहे. यासोबतच पृथ्वीराज सुकुमारन (Prithviraj Sukumaran) आणि जगपती बाबू महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या दोघांनीही ४ कोटी रुपयांचं मानधन स्विकारलं आहे. प्रशांत नील (Prashanth Neel) यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. 'केजीएफ', 'केजीएफ २' सारखे तगडे सिनेमे देणार्‍या प्रशांत नील यांनी या सिनेमासाठी ५० कोटी रुपये चार्ज केले आहेत.


सालार' या सिनेमाची निर्मिती ४०० कोटींच्या बजेटमध्ये करण्यात आली आहे. 'सालार' या सिनेमाच्या अॅडव्हान्स बुकिंगला (Advanced Booking) आता सुरुवात झाली आहे. आतापर्यंत या सिनेमाची २२ हजार ११७ तिकिटे विकली गेली आहेत. त्यामुळे रिलीजआधी या सिनेमाने ४९.३५ लाख रुपयांची कमाई केली आहे. तेलुगू, मल्याळम आणि तामिळमध्येही या सिनेमाने अॅडव्हान्स बुकिंगमध्ये चांगलाच धमाका केला आहे.


प्रशांत नील दिग्दर्शित 'सालार' या सिनेमाला 'A' सर्टिफिकेट मिळालं आहे. २ तास ५५ मिनिटांच्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'जवान' (Jawan) सिनेमासोबत या सिनेमाची टक्कर होणार आहे. 'सालार'नंतर प्रभास दीपिका पादुकोण, कमल हासन आणि अमिताभ बच्चन यांच्या 'कल्कि २८९८ एडी' या सिनेमात झळकणार आहे. हा बिग बजेट पॅन इंडिया सिनेमा आहे.


Comments
Add Comment

Papa Rao Killed in Encounter : नक्षलवाद्यांचा अजून ईक्का ठार..पोलीसांची मोठी कारवाई.

छत्तीसगड: छत्तीसगडमधील नक्षलविरोधी मोहिमेत सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे व तेथील नागरिकांना ही दिलासा

भारतीय सेनेच्या ताफ्यात कामिकाझे ड्रोन

नवी दिल्ली : ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सेना आपल्या लढाऊ क्षमतेत सातत्याने वाढ करत असून, त्याचाच भाग म्हणून सेनेने

प्रजासत्ताक दिनासाठी सुरक्षा यंत्रणा सज्ज

दहशतवादी हल्ल्याचे सावट नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर गुप्तचर यंत्रणांनी देशभरातील सुरक्षा

दिल्लीसह अनेक राज्यांत थंडीचा कहर

अनेक भागांत पावसाची शक्यता नई दिल्ली : दिल्ली-एनसीआरसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये कडक थंडी आणि धुक्याचा

भारत ब्रिक्स २०२६ अध्यक्षपदासाठी सज्ज

नवी दिल्ली : जागतिक राजकारणात भारताचे वजन सातत्याने वाढत असून, २०२६ मध्ये भारत ‘ब्रिक्स’ या समूहाचे अध्यक्षपद

अमेरिकन डाळींवर ३०% टॅरिफ; अमेरिकन शेतकरी अस्वस्थ

ट्रम्प यांना अमेरिकी सिनेटरांचे पत्र नवी दिल्ली : अमेरिकेने भारतावर जड टॅरिफ लादले असले तरी भारतानेही अमेरिकन