कोकणात अवकाळी संकट…!

Share

माझे कोकण: संतोष वायंगणकर

ऋतुचक्र बिघडलं आहे. केव्हाही पाऊस कोसळतो. या अचानक कोसळलेल्या पावसामुळे शेती-बागायतीवर त्याचा फार विपरित परिणाम होत आहे. गेल्या काही वर्षात ऋतुचक्र इतक बदललं आहे की, त्याचा परिणाम फळबागायती, शेती, मत्स्यव्यवसाय अशा सर्वांवर झालेला दिसतो. आंबा, काजू, कोकम, जांभूळ, करवंद या फळपिकांवरच कोकणातील शेतकऱ्याचं अर्थकारण अवलंबून आहे; परंतु अनियमितता असल्याने सारच बिघडून गेलं आहे. आंबा, काजू बागायतदार शेतकरी तर या सर्वांमुळे हैराणच आहेत. कोणतीही शाश्वती यामध्ये नाही. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत कडाक्याची थंडी पडते. थंडी सुरू झाली की, आंबा, काजू बागायतीला मोहोर येतो. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत जोरदार पाऊस पडल्याने झाडांना पालवी फुटली. अद्यापपर्यंत कोकणात थंडी नाही. एखाद्या रात्री कधीतरी थंडी जाणवली तरीही आंबा, काजू, फणस यांना आवश्यक असणारं वातावरणच अद्यापपर्यंत तयार झालेलं नाही.

सतत बदलत्या वातावरणाचा परिणाम हा होतच असतो. आंबा, काजू हंगाम एका ठरावीक कालावधीत जर सुरू झाला नाही, तर मग सारं चक्रच बिघडलं जाते. एकीकडे आंब्यासाठी आवश्यक आणि पोषक असलेलं वातावरण जर तयार झालं नाही, तर फलधारणा उशिरा होते. सद्यस्थितीत कोकणातील हापूस आंबा, काजू आणि फणसांवर अनेक भागातून येणाऱ्या फळांचं संकट आहे. हापूस आंबा म्हणून कर्नाटक राज्यातूनही मोठ्या प्रमाणात आंबा येऊ लागला आहे. देवगड हापूस म्हणून फलक लावून या कर्नाटक राज्यातील येणाऱ्या आंब्याची विक्री केली जात आहे. आंबा घेणाऱ्या ग्राहकांना फार उशिरा समजतं की, आपली फसवणूक झाली आहे.

कर्नाटक राज्यात मोठ्या प्रमाणावर गेल्या दहा वर्षात आंबा लागवड करण्यात आली आहे. यामुळे कर्नाटकमधून आलेला आंबा कोकण आणि मुंबईच्या बाजारातही हापूस आंबा म्हणून विकला जातो. ऋतुचक्र जसं कोकणातील शेतकऱ्याच्या अवती-भवती घिरट्या घालतय तसच बाहेरील राज्यातून येणारा काजू, आंबा, फणस मुंबई, पुणे बाजारात येत आहे. परराज्यातून येणाऱ्या या फळांच्या स्पर्धेत टिकून राहण्याचे आवाहन, तर कोकणातील शेतकऱ्यांसमोर आहेच. त्या आव्हानांना सामोरे जात असताना हवामानातील बदलाचा परिणाम फलधारणेवर होत असतो.

एकीकडे कोकणातील आंबा आजही दलालांच्या ओझ्याखालीच आहे. त्यांच्या ओझ्यातून आंबा बागायतदार शेतकरी बाहेर पडण्याचा प्रयत्न कोरोनाच्या दोन-तीन वर्षांपासून करीत आहेत. बहुतांश आंबा बागायतदार शेतकऱ्यांच्या बागेतूनच आंबा खरेदी होत आहे. काही बागायतदारांनी कोल्हापूर, पुणे भागात स्वत: जाऊन विक्री व्यवस्था निर्माण केली आहे. आंबा खरेदी करणाऱ्या सर्वसामान्यांपासून श्रीमंत वर्ग असा एक वेगळाच खरेदीदार निर्माण करण्यात आला आहे. आंबा फळाच्या गुणवत्ता आणि विश्वासार्हतेच्या आधारे ही विक्री व्यवस्था अधिक मजबुतीने उभी राहू शकते. कधी नव्हे तो विक्रीचा एक वेगळा मार्ग या आंबा बागायतदारांना सापडला आहे.

आंब्याची थेट विक्री व्यवस्थाच यातून निर्माण झाली आहे. ग्राहकही रोखीने पैसे देऊन आंबा खरेदी करतात. यामुळे कोणाकडेही उधारीचा संबंध नाही, की पैसे बुडीतही जात नाही. दर ठरवण्याचा अधिकारही आंबा बागायतदारालाच राहतो. बागायतदारांना परवडणारा दर तो सांगतो. ग्राहकही आंबा चांगला मिळणार, याची खात्री असल्याने दराच्या बाबतीतही फार घासाघीस करत नाहीत. मुंबईच्या वाशी बाजारात आंबा बागायतदारांनी पाठवलेल्या आंब्याचा दर दलाल ठरवणार, त्याचे पूर्ण अधिकार दलालाच. तो म्हणेल तोच दर निश्चित होतो. कितीही आंबा दर्जेदार असला तरीही ‘मार्केट डाऊन’ आहे. या दोनच शब्दांत आंब्याचा दरही खाली आलेला असतो. जी आंब्याची स्थिती त्यापेक्षा काजू बागायतदाराची स्थिती वेगळी नाही. आफ्रिकन काजू बाजारात येतो. केरळचा काजूही बाजारात येतो. या स्पर्धेत कोकणातील काजू बागायतदार फारच अडचणीत येतो.

कोकणातील काजूगराची टेस्ट वेगळी आहे. यामुळे कोकणातील काजूगराला मागणी आहे; परंतु बाहेरून येणाऱ्या काजूमुळे कोकणातील काजू बागायतदार शेतकऱ्याला मोठा दर प्राप्त होत नाही. काजूची आवक अचानकपणे वाढली की, दराचीही निश्चिती रहात नाही. काजू बी खरेदी करणारा व्यापारी दर निश्चित करत असतात. ठरावीक मर्यादेपलीकडे दर वाढविला जात नाही. कधी-कधी जादा काजू उत्पन्न झाले, तर मग आपोआपच दराची घसरण झालेली असते. यातूनही काजू बागायतदार शेतकऱ्याला येईल तो दर घेऊन गप्प बसावे लागते. असा हा काजू, आंबा, फणस फळांच्या बागायतीतून केव्हा चांगले पैसे मिळतील किंवा कधी मोठा तोटा सहन करावा लागेल हे आंबा, काजू बागायतदार शेतकऱ्यांना ठरवता येणं अवघड आहे. इतकी अनिश्चितता या बदलत्या ऋतुचक्राने झाली आहे.

हवामानातील बदलांचा परिणाम कोकणातील मत्स्यव्यवसायीकांना सोसावा लागतो. हवामानातील बदलाचे, समुद्री होणारे बदल त्याचा परिणाम मासेमारीवर होतो. मासेमारीचा व्यवसायही जर-तरच्या गर्तेत सापडला आहे. त्यातही पारंपरिक, पर्ससिन असा एक नवा वाद आणि स्पर्धाही सुरू झाली आहे. मत्स्यव्यवसायातही पूर्वी होत्या त्याच समस्या आजही आहेत. त्या समस्या दूर झालेल्या नाहीत. हवामानावर अवलंबून असणारे आंबा, काजू बागायत मत्स्यव्यवसाय हे सर्वच अधांतरीच झालं आहे. अवकाळी संकट आहेच. शासनाकडून कोकणातील शेतकऱ्याला देताना हात आखडता घेतला जाऊ नये. सरकार राज्यातील इतर भागांत शेतकऱ्याला उदार हस्ते मदत देते. ती आणि तशीच भूमिका कोकणातील आंबा, काजू, कोकम, फणस बागायतदार व मत्स्यव्यवसायाच्या बाबतीत द्यावी, एवढीच कोकणवासीयांची अपेक्षा आहे.

Recent Posts

मॉस्कोमध्ये पंतप्रधान मोदींचे ग्रँड वेलकम, एअरपोर्ट ते हॉटेलपर्यंत असे झाले स्वागत

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रशियाची राजधानी मॉस्को येथे पोहोचले आहेत. राष्ट्रपती व्लादीमीर पुतिन…

52 mins ago

Palghar news : रस्त्यातील खड्ड्यात आदळली बाईक! हातातून निसटल्याने दीड वर्षीय बाळाचा मृत्यू

मुसळधार पावसाचा पालघरमध्ये पहिला बळी पालघर : मुंबई, ठाण्यासह उपनगरीय भागात काल रात्रभर जोरदार पाऊस…

5 hours ago

सक्शन पंपात बिघाड, कांदिवली तुंबली!

मुंबई : कांदिवली पश्चिमेकडील पोयसर नदीवर बसवण्यात आलेल्या सक्शन पंपाचे पाईप फुटल्याने आज कांदिवलीत मोठ्या…

6 hours ago

CM Eknath Shinde : गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

मुंबई मनपा, पोलीस प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणेला सहकार्य करा : एकनाथ शिंदे अजित पवार यांनीही…

7 hours ago

ST Bus : मुसळधार पावसामुळे रेल्वेसेवा ठप्प! जाणून घ्या एसटी बस कुठून व कधी सुटणार?

हार्बर रेल्वे तसेच मेल एक्स्प्रेस रद्द झाल्याने अडकलेल्या प्रवाशांच्या सोयीसाठी बससेवा मुंबई : मुंबईत काल…

7 hours ago

Navi Mumbai news : धावत्या लोकलमधून महिला पडली! जीव वाचला पण गुडघ्यापासून दोन्ही पाय तुटले

मुसळधार पावसामुळे घडली दुर्दैवी घटना मुंबई : मुंबईसह ठाणे आणि उपनगरांत काल रात्रीपासून मुसळधार पाऊन…

8 hours ago