Sunday, July 7, 2024
Homeदेशमध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शपथ घेताच लागले कामाला, धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरवर बंदी

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शपथ घेताच लागले कामाला, धार्मिक स्थळांवर लाऊडस्पीकरवर बंदी

भोपाळ: मध्य प्रदेशात(madhya pradesh) लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आली आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच मोहन यादव(mohan yadav) यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यांनी मुख्यमंत्री बनल्यानंतर पहिला आदेश जारी केला आणि लाऊडस्पीकरवर बंदी घातली. या आदेशानुसार धार्मिक आणि सार्वजनिक स्थळांवर लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आली आहे. या आदेशासाठी सुप्रीम कोर्टाचे गाईडलाईनचा हवाला देण्यात आले आहे.

मुख्यमंत्र्यांनी हाती घेतला पदभार

मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बुधवारी मंत्रालय स्थित मुख्यमंत्री कक्षात पूजा-अर्चना करत कार्यभार हाती घेतला. कार्यभार हाती घेताच त्यांनी पहिला आदेश दिला आहे. या आदेशांतर्गत राज्यात लाऊडस्पीकरवर बंदी घालण्यात आली आहे.

आदेशाच्या प्रतीही आल्या समोर

शासनाकडून जारी करण्यात आलेल्या आदेशाच्या प्रतीही समोर आल्या आहेत. यात लिहिले आहे की विविध धार्मिक स्थळांवर निर्धारित डेसिबलचे उल्लंघन करताना लाऊडस्पीकरचा वापर केला जात आहे. आवाजामुळे मनुष्याची काम करण्याती क्षमता, आराम तसेच झोपेत व्यत्यय येतो. जोरजोरात आवाज असलेल्या वातावरणामुळे हाय बीपी, अस्वस्थता, मानसिक तणाव, अनिद्रासारखे त्रास होतात.

उज्जैन दक्षिण येथून निवडून आले मोहन यादव

मोहन यादव उज्जैन दक्षिण येथील आमदार आहे. त्यांना संघाचे अतिशय जवळचे मानले जाते. ते शिवराज सरकारमध्ये शिक्षण मंत्री होते. ते २०१३मध्ये पहिल्यांदा आमदार बनले होते. यानंतर २०१८मध्ये त्यांनी दुसऱ्यांदा उज्जैन दक्षिण येथून जागा जिंकली. मार्च २०२०मध्ये शिवराज सरकारच्या कॅनिटेमध्ये सामील झाले होते. यावेळेस ते सलग तिसऱ्यांदा या ठिकाणाहून आमदार बनले होते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -