Saturday, June 29, 2024
Homeक्रीडाSuryakumar Yadav: सूर्यकुमारने तोडला महेंद्रसिंग धोनीचा १६ वर्षांचा रेकॉर्ड

Suryakumar Yadav: सूर्यकुमारने तोडला महेंद्रसिंग धोनीचा १६ वर्षांचा रेकॉर्ड

मुंबई: सूर्यकुमार यादव(Suryakumar Yadav) यांच्या नेतृत्वात टीम इंडियाला(team india) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये पराभव सहन करावा लागला. सूर्यकुमार यादवने या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. त्याने ३६ बॉलमध्ये ५ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५६ धावा ठोकल्या.

दरम्यान, सूर्यकुमार यादवची खेळी यात भारताला विजय मिळवून देऊ शकली नाही. मात्र यावेळेस सूर्यकुमारने भारताचा दिग्गज माजी क्रिकेटर महेंद्रसिंग धोनीचा १६ वर्षांचा जुना रेकॉर्ड मोडला.

सूर्याने टी-२० कर्णधार म्हणून दक्षिण आफ्रिकेत अशी कामगिरी केली जी आजपर्यंत कोणताही भारतीय कर्णधार करू शकलेला नाही.

सूर्यकुमार यादवने ग्क्बेरहाच्या सेंट जॉर्ज पार्क स्टेडियममध्ये खेळवल्या गेलेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय करिअरमधील १७वे अर्धशतक ठोकले. सूर्या दक्षिण आफ्रिकेत अर्धशतक ठोकणारा भारताचा पहिला टी-२० कर्णधार बनला आहे. याआधी टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने २००७मध्ये दक्षिण आफ्रिकेत जात ४५ धावांची खेळी केली होती.

सूर्याने टी-२०मध्ये पूर्ण केल्या २००० धावा

सूर्यकुमार यादवने दुसऱ्या टी-२० सामन्यात आपल्या टी-२० आंतरराष्ट्रीय करिअरमधील २००० धावा पूर्ण केल्या. क्रिकेटच्या छोट्या फॉरमॅटमध्ये रँकिंगमध्ये नंबर वनवर विराजमान असलेला सूर्या सगळ्यात वेगवान २००० धावा करणारा चौथा खेळाडू बनला आहे. त्याने ५६ डावांत हे यश मिळवले. विराट कोहलीनेही आपल्या सुरूवातीच्या २००० धावा ५६ डावात पूर्ण केल्या होत्या.

टी-२०मध्ये सूर्याची ३ शतके

सूर्यकुमार यादवने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ३ शतके ठोकली आहेत. सध्या तो आयसीसीच्या टी-२० फलंदाजीच्या रँकिंगमध्ये पहिल्या स्थानावर आहे. सूर्याच्या नेतृत्वात भारताने नुकतीच ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच सामन्यांची टी-२० मालिका ४-१ अशी जिंकली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -