Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीShortage Of Condoms : थंडी सुरू होताच भारतात कंडोमचा तुटवडा!

Shortage Of Condoms : थंडी सुरू होताच भारतात कंडोमचा तुटवडा!

रिपोर्टमधून केलेला दावा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने फेटाळला; सरकारकडे कंडोमचा मुबलक साठा

नवी दिल्ली : जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश म्हणून नोंद झालेल्या भारतात काही रिपोर्ट्समधून भारतात कंडोमचा तुटवडा जाणवणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. येत्या काळात देशात कंडोमची कमतरता (Shortage Of Condoms) भासणार असल्याचा दावा या रिपोर्ट्समधून केला जात आहे. तसेच केंद्रीय खरेदी एजन्सी, सेंट्रल मेडिकल सर्व्हिसेस सोसायटी (CMSS), वेळेवर गर्भनिरोधकांचा पुरवठा (Supply of Contraceptives) करण्यात अयशस्वी ठरल्याचाही दावा या रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे. यामुळे भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमावर (Family Planning Program) गंभीर परिणाम होईल, असेही म्हटले जात आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Ministry of Health) हे वृत्त फेटाळून लावले आहे.

ऑल इंडिया कंडोम मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, ज्यामध्ये कंडोम ब्रँड ‘निरोध’ बनवणारी कंपनी देखील समाविष्ट आहे, त्यांनी सरकारला पत्र लिहून कळवले होते की, CMSS कंडोम खरेदी करण्यात अयशस्वी ठरल्याचा दावाही रिपोर्ट्समधून करण्यात आला आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने असे वृत्त चुकीचे आणि दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे.

आरोग्य मंत्रालयाचे म्हणणे आहे की, सरकारकडे गर्भनिरोधक औषधांचा जो सध्याचा साठा आहे. राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, मंत्रालयाच्या विविध कार्यक्रमांसाठी CMSS विविध औषधं आणि वैद्यकीय वस्तू खरेदी करते आणि त्यांची निविदा प्रक्रिया तसेच, पुरवठ्याच्या स्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जाते.

नवी दिल्लीत CMSS एक स्वायत्त संस्था आहे. जी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येते. केंद्रीय खरेदी एजन्सी राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमासाठी कंडोम खरेदी करते. CMSS ने मे २०२३ मध्ये कुटुंब नियोजन कार्यक्रमासाठी ५.८८ कोटी कंडोम खरेदी केले आहेत. सरकारकडे सध्या उपलब्ध असलेल्या कंडोमची संख्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. सध्या, NACO (National Aids Control Organisation) ही संस्था M/S HLL Lifecare लिमिटेड कंपनीकडून ७५ टक्के मोफत कंडोम पुरवठा करत आहे आणि CMSS २०२३-२४ साठी उर्वरित २५ टक्के कंडोम नुकत्याच मिळालेल्या मंजुरीच्या आधारे पुरवणार आहे.

M/S HLL Lifecare Limited कंपनीने NACO साठी ६.६ कोटी कंडोम दान केले आहेत. कंडोमची ही संख्या सध्याच्या सर्व गरजा पूर्ण करण्यासाठी पुरेशी आहे. तसेच, CMSS च्या खरेदीला विलंब झाल्यामुळे कंडोमचा तुटवडा जाणवला नाही. CMSS ने चालू आर्थिक वर्षात कंडोम खरेदीसाठी आधीच निविदा जारी केल्या आहेत आणि निविदांचे काम अंतिम टप्प्यात आहे.

आरोग्य मंत्रालय सध्या परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याने काळजी करण्याचे कारण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे. निविदा प्रक्रिया, औषधं आणि वैद्यकीय वस्तूंच्या पुरवठ्यावर लक्ष ठेवण्यासाठी मंत्रालयाची साप्ताहिक आढावा बैठक आयोजित करण्यात येत असल्याचेही मंत्रालयाने म्हटले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -