Rise in Price of Veggies : गारपिटीमुळे भाज्यांचे नुकसान; आवक कमी झाल्याने भाज्या महागल्या

शेतकर्‍यासह सामान्य माणूस चिंतेत; जाणून घ्या भाज्यांचे दर 


मुंबई : यंदाच्या वर्षी वातावरणात झालेल्या बदलांमुळे (Changes in Weather) शेतकर्‍याला (Farmers) प्रचंड नुकसान (Loss) सहन करावे लागले आहे. अवकाळी पावसामुळे पिके वाहून गेली तर काही ठिकाणी पिकांवर रोग पडला, बुरशी धरली. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत सापडला. त्यातच राज्यभरात काही ठिकाणी गारपीट झाली. विदर्भाला याचा मोठा फटका बसला. या खराब हवामानामुळे भाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे बाजारात भाज्यांची आवक कमी झाली आहे.


कमी भाज्यांच्या उत्पादनामुळे भाज्या महागल्या आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांच्या नुकसानासह सामान्यांच्या खिशालाही कात्री बसणार आहे. नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दुधीभोपळा, फ्लॉवर आणि मिरचीसह अनेक पालेभाज्यांच्या किंमतीत वाढ झाली आहे.


बाजार समितीमध्ये काल राज्याच्या विविध भागांतून आणि परराज्यांमधून ६५५ वाहनांतून ३००० टन भाजीपाल्याची आवक झाली. दुधीभोपळ्याची किंमत दर किलोमागे ११ ते १५ रुपयांवरुन २८ ते ४० रुपयांवर गेले आहेत. फ्लॉवरचा दर ८ ते १० रुपयांवरुन १० ते १४ रुपयांवर गेला आहे. याशिवाय हिरव्या मिरचीसह पालेभाज्यांचेही दर वधारले आहेत.



भाज्यांच्या दरांत अशी वाढ झाली आहे :-



  • दुधीभोपळा - आधीचा दर ११ ते १५ रुपये किलो, आताचा दर २८ ते ४० रुपये किलो

  • फ्लॉवर - आधीचा दर ८ ते १० रुपये किलो, आताचा दर १० ते १४ रुपये किलो

  • कारले - आधीचा दर १० ते १५ रुपये किलो, आताचा दर १४ ते २२ रुपये किलो

  • ढोबळी मिरची - आधीचा दर २० ते २४ रुपये किलो, आताचा दर २५ ते २८ रुपये किलो

  • फ्लॉवर - आधीचा दर ८ ते १० रुपये किलो, आताचा दर १० ते १४ रुपये किलो

  • हिरवी मिरची - आधीचा दर ३४ ते ४० रुपये किलो, आताचा दर १६ ते ८० रुपये किलो

  • कोथिंबीर - आधीचा दर १० ते १५ रुपये जुडी, आताचा दर ६ ते २८ रुपये जुडी

  • मेथी - आधीचा दर १० ते १५ रुपये जुडी, आताचा दर ७ ते २२ रुपये जुडी


हे दर घाऊक बाजारातील असून साध्या बाजारात गेल्यास सध्या तरी या स्वस्त किमतीत भाज्या मिळत नाहीत. यापेक्षा अधिक किंमतीने भाज्या विकल्या जात आहेत.

Comments
Add Comment

Minister Nitesh Rane : महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेबाबत मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई: महाराष्ट्र सागरी व भूजलशाही मच्छीमार कल्याणकारी महामंडळाच्या स्थापनेसंदर्भात मंत्रालयात

Nitesh Rane: ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या विकासकामांचा नितेश राणेंकडून आढावा

मुंबई: मत्स्यव्यवसाय आणि बंदरे मंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी मुंबईतील ससून डॉक आणि मरोळ मच्छीमार मार्केटच्या

Devendra Fadnavis : सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २२ हजार ४२५ कोटींचा विकास आराखडा

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली शिखर समितीची मंजुरी; केंद्रीय पर्यटन मंत्र्यांची लोकसभेत माहिती मुंबई :

Country's First Travelator Skywalk in Mumbai : महालक्ष्मी येथे मेट्रो, मोनो आणि रेल्वे होणार एकत्र, प्रवाशांचा वेळ वाचणार

मुंबई: मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत एका ऐतिहासिक आणि क्रांतिकारी प्रकल्पाची भर पडत आहे. एमएमआरडीतर्फे (MMRDA)

Nitin Gadkari : 'इथेनॉल'च्या ट्रोलिंगबाबत नितीन गडकरींनी दिवाणी खटला दाखल करावा

मुंबई उच्च न्यायालय; पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाच्या अखत्यारित मुंबई :

Archaeology Department on Gopalgad : शिवरायांचा ‘गोपाळगड’ खासगी विळख्यातून मुक्त होणार; पुरातत्त्व विभागाकडून भूसंपादन प्रक्रिया सुरू

२२० रुपयांच्या बोलीवर झाला होता लिलाव https://prahaar.in/2026/07/27/rain-god-blesses-the-kharif-season-what-are-the-dam-water-levels-in-nashik-and-other-divisions/ मुंबई : गुहागर