
नवी दिल्ली: इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने(england and wells cricket board) भारताविरुद्ध पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी(test series) आपल्या संघाची घोषणा केली आहे. इंग्लंडने २५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेसाठी १६ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघात स्टार ऑलराऊंडर सॅम कर्रन आणि विकेटकीपर फलंदाज जोस बटलर यांना स्थान देण्यात आलेले नाही. दरम्यान, तीन नव्या चेहऱ्यांना संघात स्थान देण्यात आले आहे.
इंग्लंडने भारताविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी तीन नवे चेहरे समाविष्ट केले आहेत. यात शोएब बशीर, टॉम हार्टले आणि गस एटकिंसन यांचा समावेश आहे. तर ओली पोप या संघाचा उप कर्णधार आहे. इंग्लंडने टॉम हार्टले, जॅक लीच आणि रेहान अहमदच्या रूपात तीन स्पिनर्सना संघात जागा दिली आहे.
भारतात पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंड संघात ज्यो रूट, जॉनी बेअरस्ट्रॉ, हॅरी ब्रुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन स्टोक्स, शोएब बशीर, बेन फॉक्स आणि ओली पोप यांच्या रूपात नऊ फलंदाज आहेत.
जानेवारीत बेन स्टोक्सचा संघ पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये खेळवला जाणार आहे. यानंतर २ फेब्रुवारीपासून दुसरी कसोटी विशाखापट्टणम येथे, १५ फेब्रुवारीपासून तिसरी कसोटी राजकोटमध्ये, २३ फेब्रुवारीपासून चौथी कसोटी रांचीमध्ये आणि सात मार्चपासून शेवटची कसोटी धर्मशालामध्ये खेळवली जाणार आहे.
भारताविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा संघ - बेन स्टोक्स(कर्णधार), रेहान अहदमद, जेम्स अँडरसन, गस एटकिंसन, जॉनी बेअरस्ट्रॉ(विकेटकीपर), शोएब बशीर, हॅरी ब्रुक, जॅक क्रॉली, बेन डकेट, बेन फॉक्स, टॉम हार्टले, जॅक लीच, ओली पोप, ओली रॉबिन्सन, ज्यो रूट आणि मार्क वूड.
भारत-इंग्लंड पाच सामन्यांच्या मालिकेचे वेळापत्रक
पहिली कसोटी - भारत वि इंग्लंड, २५-२९ जानेवारी, हैदराबाद
दुसरी कसोटी - भारत वि इंग्लंड, २-६ फेब्रुवारी, विशाखापट्टणम
तिसरी कसोटी - भारत वि इंग्लंड, १५-१९ फेब्रुवारी, राजकोट
चौथी कसोटी - भारत वि इंग्लंड, २३-२७ फेब्रुवारी, रांची
पाचवी कसोटी- भारत वि इंग्लंड, ७-११ मार्च, धर्मशाला