ज्ञानेश्वर माऊलीच्या आळंदीत वैष्णवांचा मेळावा

  84

घंटानाद अन पुलांची उधळण करत संजीवनी समाधी सोहळा पडला पार


पुणे : 'ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम'चा घोष, घंटानाद... समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी... संत नामदेव महाराज व माऊलींची भेट आणि असंख्य भाविकांचे पाणावलेले डोळे... अशा भावपूर्ण वातावरणात माउलींचा ७२७ वा संजीवन समाधी सोहळा सोमवारी पार पडला.


संजीवन सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या असंख्य भाविकांनी हा सोहळा प्रत्यक्ष अनुभवत ‘श्री’चे दर्शन घेतले. तत्पूर्वी, माऊलींना पवमान अभिषेक व दुधआरती घालून पहाटे तीनच्या सुमारास प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, विश्वस्त विकास ढगे - पाटील यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. विना मंडपात देवस्थानच्या वतीने कीर्तन झाल्यानंतर मुख्य संजीवन सोहळ्याला सुरुवात करण्यात आली.


सकाळी दहाला संत नामदेव महाराजांचे वंशज ह.भ.प. नामदास महाराजांचे कीर्तन सुरु झाले. यावेळी विनामंडपात कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी भाविकांची मोठी रीघ लागली होती. दरम्यान मंदिराच्या महाद्वारात काल्याचे कीर्तन व हैबतबाबा दिंडीचे आगमन झाले. टाळ-मृदंगाच्या निनादात हैबतबाबांच्या दिंडीने समाधी मंदिरास प्रदक्षिणा पूर्ण करून ज्ञानदेवांचा जयघोष केला. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास संजीवन समाधी सोहळ्याच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.


घंटानाद, अभिषेक आणि आरती घेण्यात आली. संत नामदेव महाराजांच्या पादुका त्यांच्या वंशजांच्यामार्फत विना मंडपातून कारंज्या मंडप, पंखा मंडप व मुख्य गाभाऱ्यात माऊलींच्या समाधीपुढे विराजमान करण्यात आल्या व ''पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय'' अशा जयघोषात माऊलींच्या समाधीवर फुलांची पुष्पवृष्टी करून समाधी सोहळा साजरा करण्यात आला.


संत श्री नामदेव महाराजांच्या वंशजांनी टाळ - मृदुंगाच्या निनादात नामदेव महाराजांच्या पादुकांची मंदिर प्रदक्षिणा पूर्ण करून जयजयकार केला. या वेळी पादुकांचे दर्शन घेण्यासाठी मंदिराच्या आवारात भाविकांची मोठी गर्दी झाली होती. सायंकाळी साडेसहा वाजता विना मंडपात ह.भ.प. सोपानकाका महाराज देहूकर यांचे हरीकीर्तन झाले. तर रात्री उशिरा ‘श्रीं’च्या गाभाऱ्यात देवस्थानच्या वतीने नारळ - प्रसाद वाटून त्रयोदशीची सांगता करण्यात आली.

Comments
Add Comment

गाईच्या दूध खरेदी दरात वाढ, आता ३५ रुपये प्रतिलिटर दर

सोलापूर : राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. खासगी आणि सहकारी दूध संघांनी गाईच्या

खातेअंतर्गत PSI परीक्षेचा मार्ग मोकळा, मिळणार २५ टक्के आरक्षण

राज्य सरकारने पीएसआय पदासाठी विभागीय परीक्षा पुन्हा सुरू केली मुंबई: राज्य सरकारने पीएसआय पदासाठी २५ टक्के

अटल सेतुसह अन्य टोल नाक्यावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी: प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई: राज्यातील इलेक्ट्रिक वाहन उद्योगाला व वाहनधारकांना चालना देण्यासाठी टोल नाक्यावर टोलमाफी देण्याचे धोरण

Beed Crime : "परळी हादरली! आईला झोप लागली अन् चार वर्षांच्या चिमुकलीवर परळी रेल्वे स्थानकात अत्याचार, आरोपीला फाशीचीच मागणी

परळी : परळी रेल्वे स्थानक परिसरात अवघ्या चार वर्षांच्या बालिकेवर झालेल्या अमानुष अत्याचाराची घटना समोर

Nitesh Rane on Jarange Patil: जरांगेंचे आंदोलन संपल्यानंतर मंत्री नितेश राणे यांची प्रतिक्रिया, "ज्या फडणवीसांवर टीका करत होते, त्यांनीच..."

मुंबई: मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर गेले ५ दिवस नेते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानावर आमरण उपोषण

Manoj Jarange health Update: मुंबईतील उपोषणानंतर जरांगे संभाजीनगरच्या रुग्णालयात दाखल; डॉक्टरांनी प्रकृतीबाबत दिली ही माहिती

संभाजीनगर: आझाद मैदानावरील पाच दिवसांच्या आमरण उपोषणाची यशस्वी सांगता करत, अखेर मनोज जरांगे पाटील यांनी आपल्या