बॉलिवूडच्या चित्रपटांना ‘झिम्मा २’ची टक्कर

ऐकलंत का!: दीपक परब


बॉलिवूडचे दोन मोठे चित्रपट प्रदर्शित झाले असतानाही हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘झिम्मा २’ या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. तिसऱ्या यशस्वी आठवड्यातही ही ‘झिम्मा २’ची टूर सुसाट सुटली आहे. इतकेच नाही तर आता याचे शोजही वाढवण्यात आले आहेत. कोटींची कमाई करणाऱ्या या चित्रपटावर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाची टीम थिएटर्सना भेटी देऊन प्रेक्षकांच्या थेट प्रतिक्रिया घेत आहेत. एकदंरच हसताहसता डोळ्यांत चटकन पाणी आणणारा आणि रडता रडता मनमुराद हसवणारा ‘झिम्मा २’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलाय हे नक्की.


चित्रपटाला प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या भरभरून प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणाले, खूप छान वाटतेय. एवढा उदंड, भरभरून प्रतिसाद मिळेल, असे खरोखर वाटले नव्हते. प्रेक्षक आपले खास दिवस ‘झिम्मा २’ बघून साजरे करत आहेत. २-३ वेळा चित्रपट पाहायला आलेले प्रेक्षकही अनेक आहेत. खूप छान सवाटतेय. खरंतर ‘झिम्मा २’ला प्रेक्षक कसे स्वीकारतील, याबद्दल मनात जरा भीतीच होती. कारण ‘झिम्मा’ला प्रेक्षकांनी खूप मोठे केले होते. त्यामुळे हा चित्रपटाला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतील, प्रेक्षकांना हा आवडेल का, असे अनेक प्रश्न मनात होते. शिवाय 'झिम्मा २' सोबत बॉलिवूडचे काही मोठे सिनेमेही प्रदर्शित झाले आहेत. त्यामुळे जरा दडपण होते; परंतु आता दोन आठवडे झाले आहेत.


प्रेक्षक आजही ‘झिम्मा २’ला पसंती देत आहेत. या चित्रपटांसोबत ‘झिम्मा २’ स्पर्धा करतोय आणि हे भारी फीलिंग आहे. आपला चित्रपट यशस्वी दुसरा आठवड्यानंतर तिसऱ्या आठवड्यात पदार्पण करत आहे. शोजही वाढले आहेत. त्यामुळे आशा आहे, हा आठवडाही असाच हाऊसफुल्ल जाईल. अर्थात हे सगळे यश माझ्या एकट्याचे नसून संपूर्ण टीमचे आहे. आनंद एल. राय, क्षिती जोग आणि जिओ स्टुडिओजची साथ लाभल्यानेच आम्ही हा पल्ला गाठू शकलो’.

Comments
Add Comment

येता आनंदा उधाण...

प्रासंगिक : अजय पुरकर दीपावलीच्या शुभेच्छा देताना आनंद होतो आहे. सध्या जगण्याचे आयाम बदलले आहेत. माणूस

दिवा आणि दिवाळी...

संवाद : गुरुनाथ तेंडुलकर मी जयहिंद कॉलेजमधे शिकत असताना घडलेली ही घटना. आमच्या कॉलेजमधे दरवर्षी नवरात्रोत्सव

“एक वो भी दिवाली थी...!”

नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे दिवाळीच्या आठवणी हा मोठा रम्य विषय असतो, सर्वांसाठीच! ज्यांच्यासाठी आता अनेक

स्वर्ग मंडप असलेले शिल्पकाव्य कोपेश्वर मंदिर

विशेष : लता गुठे आपल्या महाराष्ट्रामध्ये अभिमान वाटावा अशा अनेक शिल्पाकृती आहेत. यादवांच्या कारकिर्दीचा

विनोदी लेखक रमेश मंत्री

कोकण आयकॉन सतीश पाटणकर प्रवासवर्णनकार, कथाकार, विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातले एक सारस्वत

नल कुबेर व मणिग्रीव

महाभारतातील मोतीकण : भालचंद्र ठोंबरे द्वापार युगातील गोष्ट आहे. कुबेराला नल कुबेर व मणिग्रीव नावाची दोन मुले