Mukhyamantri Vaidyakiya Sahayata Nidhi : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या रुग्ण सेवेचा चढता आलेख; १९ हजारांहून अधिक रुग्णांचे वाचले प्राण

  535

अवघ्या १ वर्ष ५ महिन्यांमध्ये तब्बल १५६ कोटींपर्यंत अर्थसहाय्य वाटप


मुंबई : मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे. या योजनेमुळे अनेक रुग्णांना जीवनदान मिळत असल्याने ही योजना आता महाराष्ट्र राज्य सरकारची महत्वाकांक्षी योजना ठरत असल्याचे प्रतिपादन राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. गोरगरीब - गरजू रुग्णांना दुर्धर आणि महागड्या शस्त्रक्रियांसाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षातून थेट अर्थसहाय्य केले जात आहे. या योजनेमुळे रुग्णांचे प्राण वाचत असल्याने मुख्यमंत्री कार्यालयात आलेला एकही रुग्ण हा मदतीविना वंचित राहता कामा नये याची दक्षता घेण्याचे आदेश मुख्यमंत्री श्री शिंदे यांनी दिले आहेत.


यानुसार आपल्या सातत्यपूर्ण कामगिरीचा आलेख कायम राखत या कक्षाने अवघ्या १७ महिन्यात १९ हजारांहून अधिक गोरगरीब -गरजू रुग्णांना एकूण १५६ कोटी ६० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित केली आहे.


श्री एकनाथजी शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्विकारताच महाविकास आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष तात्काळ सुरू केला. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मूळ संकल्पना मांडणाऱ्या मंगेश नरसिंह चिवटे यांची विशेष कार्य अधिकारी म्हणून नियुक्ती करून मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांनी या कक्षाची जबाबदारी त्यांना दिली होती.


मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे आणि उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मागील वर्षी पहिल्याच जुलै महिन्यात १७८ रुग्णांना ७६ लाखांची मदत देण्यात आली. नंतर ऑगस्ट महिन्यात २४४ रुग्णांना १ कोटी १ लाख, सप्टेंबर महिन्यात ३१९ रुग्णांना १ कोटी ८६ लाख, ऑक्टोबर महिन्यात २७६ रुग्णांना २ कोटी ३५ लाख, नोव्हेंबर महिन्यात ५२७ रुग्णांना ४ कोटी ५० लाख, डिसेंबर महिन्यात १०३१ रुग्णांना ८ कोटी ५२ लाख, जानेवारी २०२३ मध्ये १०३२ रुग्णांना ८ कोटी ९० लाख तर फेब्रुवारी २०२३ मध्ये १२७४ रुग्णांना १० कोटी ५९ लाख, मार्च २०२३ मध्ये १४६९ रुग्णांना ११ कोटी ९३ लाख, एप्रिल मध्ये ११९० रुग्णांना ९ कोटी ९१ लाख, मे मध्ये १३२९ रुग्णांना ११ कोटी २५ लाख, तर जून मध्ये १७२८ रुग्णांना १४ कोटी ६२ लाख, जुलै १४८८ रुग्णांना १२ कोटी ७२ लाख, ऑगस्ट मध्ये १५६७ रुग्णांना १३ कोटी १४ लाख, तर सप्टेंबर मध्ये विक्रमी १४०८ रुग्णांना ११ कोटी ७७ लक्ष रुपयांची वैद्यकीय मदत देण्यात आली आहे.


तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता मदत मिळवण्यासाठी मंत्रालयात जाण्याचीही गरज नाही पूर्णपणे ऑनलाईन प्रोसेस करून वैद्यकीय मदत मिळणार असल्याचे कक्ष प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. यासाठी ८६५०५६७५६७ या टोल फ्री क्रमांकावर कॉल करून थेट आपल्या मोबाईलवर अर्ज मिळवता येईल.


संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या सूचनेनुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी मध्ये अनेक-विविध आजारांचा समावेश देखील करण्यात आला असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी दिली आहे. यामध्ये अँजिओप्लास्टी, बायपास सर्जरी, कर्करोगावरील शस्त्रक्रिया, केमोथेरपी, डायलिसिस, जन्मतः मूकबधिर लहान मुलांसाठी अत्यावश्यक असणारी कॉकलीयर इनप्लांट शस्त्रक्रिया, सर्व प्रकारचे अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, रस्ते अपघात, विद्युत अपघात, भाजलेले रुग्ण, जन्मतः लहान मुलांच्या हृदयशस्त्रक्रिया आदींचा समावेश आहे.


मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचा जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा असे आवाहन कक्ष प्रमुख मंगेश नरसिंह चिवटे यांनी केले आहे.


Comments
Add Comment

मुख्यमंत्र्यांच्या आईबाबत मनोज जरांगेंचे वक्तव्य वादाच्या भोवऱ्यात

मुंबई : मराठा समाजाला सरसकट कुणबी दर्जा आणि आरक्षण द्या, अशी मागणी करत मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना

मरिनड्राईव्हच्या समुद्रात तरुणीचा मृतदेह! परिसरात एकच खळबळ

मुंबई: मुंबईच्या मरिनड्राईव्ह परिसरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नरिमन पॉईंट येथील समुद्रात एका तरुणीचा

मुंबईत यंदा २७५ कृत्रिम तलावांची निर्मिती

मुंबई (खास प्रतिनिधी) : श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये व्हावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेकडून

समुद्र किनाऱ्यांची कचऱ्यातून सुटका

मुसळधार पावसामुळे चौपाट्यांवर पसरलेला कचरा साफ मागील नऊ दिवसांमध्ये ९५० मेट्रीक टन कचऱ्याची लावली

सेंच्युरी मिलची जागा गिरणी कामगारांच्या घरांसाठी मिळण्याचा मार्ग मोकळा

सेंच्युरी मिल व्यवस्थापनाने जागा देणार; गिरणी कामगार संघर्ष समितीच्या मागणीला यश मुंबई : वरळी येथील सेंच्युरी

मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड, पालिकेआधी भाजपचा मोठा निर्णय, कोण आहेत अमित साटम?

मुंबई पालिका निवडणुकीच्याआधी भाजपने एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई अध्यक्षपदी अमित साटम यांची निवड झाली आहे.