Tripti Dimri Animal : तू असं करायला नको होतं...

तृप्तीच्या 'अ‍ॅनिमल' मधील इंटिमेट सीन्सवर पालकांसह तृप्तीचीही प्रतिक्रिया आली समोर


मुंबई : सध्या बॉक्स ऑफिसवर (Box office) 'अ‍ॅनिमल' (Animal) हा चित्रपट चांगलाच धुमाकूळ घालत आहे. यात जे कलाकार ट्रेलरमध्ये फारसे दिसलेही नव्हते त्यांचीच चर्चा होत असल्याचं दिसत आहे. मराठी कलाकार उपेंद्र लिमये (Upendra Limaye) याच्या 'अ‍ॅनिमल'मधील कामाचं भरभरुन कौतुक होत आहे. तर अभिनेत्री तृप्ती डिमरीचीही (Tripti Dimri) प्रचंड चर्चा होत आहे. तिचं काम चाहत्यांना भलतंच आवडलं आहे.


'अ‍ॅनिमल' चित्रपटात तृप्तीने रणबीर कपूरसोबत (Ranbir Kapoor) अनेक इंटिमेट सीन्स (Intimate scenes) दिले आहेत. या सीन्सचीही सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड चर्चा आहे. यापूर्वी तृप्तीने ते सीन कसे शूट झाले होते आणि दिग्दर्शक संदिप रेड्डी (Sandeep Reddy) आणि रणबीरने ती परिस्थिती कशी हाताळली हे सांगितले होते. आता तिच्या या इंटिमेट सीनवर तिच्या पालकांची कशी प्रतिक्रिया होती हे तिने सांगितले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर आपल्या मुलीला अशा भूमिकेत पाहून तिच्या आईवडिलांची प्रतिक्रिया समोर आली आहे.


रणबीर कपूरसोबतचे ते इंटिमेट सीन पाहून पालकांना धक्का बसल्याचे तृप्तीने सांगितले. ते म्हणाले, 'आम्ही चित्रपटांमध्ये असं काही यापूर्वी पाहिलं नाही आणि तू ते केलं.' त्या सीन्समधून सावरायला त्यांना थोडा वेळ लागला. ते पुढे म्हणाले, 'तू हे करायला नको होतं, पण ठीक आहे. पालक या नात्याने आम्हाला असं वाटणं सहाजिक आहे, असा खुलासा तृप्तीने केला.


पुढे ती म्हणाली, 'मी त्यांना सांगितले की मी काहीही चुकीचे केले नाही. हे माझे काम आहे आणि जोपर्यंत मी सुरक्षित आहे तोपर्यंत मला ते करण्यात काहीही अडचण वाटत नाही. मी एक अभिनेत्री आहे आणि मी साकारलेल्या व्यक्तिरेखेशी मी १०० टक्के प्रामाणिक असलं पाहिजे आणि मी ते केले.'


तृप्ती डिमरीने 'लैला मजनू' या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. 'बुलबुल' आणि 'कला'मध्येही तिने काम केले आहे. मात्र तृप्ती डिमरीसाठी 'अ‍ॅनिमल' चित्रपट टर्निंग पॉइंट ठरला. आता ती अनिल रविपुडी यांच्या आगामी 'मास महाराजा' या चित्रपटातून साऊथ चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे.

Comments
Add Comment

दिल्लीत ५ रुपयांत मिळेल जेवण अटल कॅन्टीन सुरू

१०० ठिकाणी स्टॉल, प्रत्येक स्टॉलमध्ये ५०० लोकांसाठी जेवणाची सोय नवी दिल्ली : दिल्ली सरकारने माजी पंतप्रधान

ऑनलाइन डिलिव्हरी बंदमुळे देशातील अनेक भागांत ग्राहकांची अडचण

३१ डिसेंबरलाही मिळणार नाही सेवा हैदराबाद : ॲमेझॉन, झोमॅटो, झेप्टो, ब्लिंकिट, स्विगी आणि फ्लिपकार्टसारख्या प्रमुख

मद्यपानाचे अल्प प्रमाणही मुख कर्करोगाला कारण

मुंबई : तंबाखू, गुटखा व सुगंधी सुपारी मुख कर्करोगासाठी कारणीभूत असल्याचे यापूर्वी अनेक संशोधनांतून स्पष्ट झाले

लष्कराच्या जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी

ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट... नवी दिल्ली : भारतीय लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला

'पतीने पत्नीचा फोन फोडणे गैर नाही'

मध्य प्रदेश उच्च न्यायालयाकडून घटस्फोटाचा निर्णय कायम जबलपूर : "कोणत्याही पतीला आपली पत्नी व्यभिचारात

ग्रीन टीला यापुढे ‘चहा’ म्हणणे बेकायदा !

भारतीय अन्न सुरक्षा व मानक प्राधिकरणाचा निर्णय नवी दिल्ली : ग्रीन टीला आता ‘चहा’ म्हणणे बेकायदेशीर आहे, असे