Mahua Moitra suspended : खासदारकी रद्द! महुआ मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी

  125

कॅश फॉर क्वेरी प्रकरण भोवलं


नवी दिल्ली : तृणमूल काँग्रेसच्या (Trinmul Congress) खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांची कॅश फॉर क्वेरी (Cash For query) म्हणजे पैसे घेऊन प्रश्न विचारल्या प्रकरणात लोकसभेतून (Loksabha) हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांच्यावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या एथिक्स कमिटीच्या शिफारशीवरुन त्यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. आज लोकसभेत याप्रकरणावर एथिक्स कमिटीचा अहवाल सादर करण्यात आला. लोकसभेने विरोधी व सत्ताधारी पक्षांनी केलेल्या मतदानानंतर हा निर्णय घेतला.


मंगळवारी लोकसभेत मांडण्यात आलेल्या "कॅश फॉर क्वेरी" प्रकरणात एथिक्स कमिटीच्या अहवालाने महुआ मोईत्रा यांच्या अनैतिक वर्तनाची चौकशी करण्याची आणि लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस केली होती. सरकारी चौकशीची मागणी करताना त्यात म्हटले होते की, महुआ मोईत्राच्या अत्यंत आक्षेपार्ह, अनैतिक आणि गुन्हेगारी वर्तनाच्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने तीव्र, कायदेशीर, संस्थात्मक चौकशी करावी. समितीने महुआ मोईत्रा आणि दर्शन हिरानंदानी यांच्यातील रोख व्यवहारांच्या 'मनी ट्रेल'ची चौकशी करण्याची शिफारसही केली आहे.


या प्रकरणात विरोधी सदस्यांनी मोईत्रा यांना पाठिंबा दर्शवला, तर एनडीएच्या मित्रपक्षांनी राष्ट्रीय सुरक्षेचा हवाला देत हा मुद्दा उपस्थित केला. एनडीएच्या मित्रपक्षांनी मोईत्रा यांची खासदारकी रद्द करण्याच्या बाजूने मतदान केले, तर विरोधी सदस्यांनी मतदानादरम्यान मौन पाळले. तर अनेक सदस्यांनी मोईत्रा यांनी बोलण्याची परवानगी न दिल्याने सभात्याग केला.


"खासदार महुआ मोईत्रा यांचे खासदार म्हणून वर्तन अनैतिक आणि अशोभनीय होते हा समितीचा निष्कर्ष हे सभागृह मान्य करते. त्यामुळे त्यांनी खासदार म्हणून राहणे योग्य नाही," असे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी निर्णय जाहीर करताना सांगितले.



महुआ मोईत्रा यांच्यावर नेमके काय आरोप?


उद्योगपती दर्शन हिरानंदानी यांनी शपथपत्रात कबूल केले आहे की, पंतप्रधान मोदींची प्रतिमा मलिन करण्यासाठी मोईत्रा यांनी गौतम अदानी यांना लक्ष्य केले. हिरानंदानी यांनी संसदेत प्रश्न विचारण्यासाठी तृणमूलच्या खासदाराला म्हणजेच मोईत्रा यांना पैसे दिल्याचा आरोप आहे.


Comments
Add Comment

अजित डोवाल यांनी घेतली अमित शहांची भेट

नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी संसद भवनात अंतर्गत सुरक्षेसंदर्भात सुमारे ३० मिनीटे

Operation Mahadev मध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांकडे सापडल्या 'या' गोष्टी! कधी आणि कसा रचला गेला पहलगाम हल्ल्याचा कट? सर्व झाले उघड

नवी दिल्ली: पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. पहलगाम

सच्चा भारतीय असं बोलणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींना फटकारले

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने राहुल गांधींविरुद्धच्या मानहानीच्या एका खटल्याला स्थगिती दिली. ही स्थगिती

काँग्रेसच्या महिला खासदारानं केली तक्रार, पोलीस अलर्ट, तपास सुरू

नवी दिल्ली : दिल्लीच्या चाणक्यपुरीत मॉर्निंग वॉक करताना चोरट्याने सोनसाखळी चोरली अशी तक्रार काँग्रेसच्या

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन

नवी दिल्ली : झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे सोमवारी ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी प्रदीर्घ आजाराने निधन

Amarnath Yatra 2025: अमरनाथ यात्रेबद्दल सरकारचा मोठा निर्णय, एक आठवड्याआधीच यात्रा थांबवली! 'हे' आहे कारण

खराब हवामान आणि यात्रा मार्गांची बिघडलेली अवस्था जबाबदार श्रीनगर : वार्षिक अमरनाथ यात्रा आज (दिनांक ३ )