Income Tax Department : अबब! छापेमारीत सापडली एवढी रक्कम की नोटा मोजणारे मशीनही पडले बंद!

ओडिसा आणि झारखंडमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई


लखनौ : आयकर विभागाने (Income Tax Department) ओडिसा आणि झारखंडमध्ये (Odisha and Jharkhand) केलेल्या छापेमारीत (Raid) तोंडात बोटे घालायला लावेल इतकी रक्कम सापडली आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे ही रक्कम मोजता मोजता पैसे मोजणारी मशीनच थकून बंद पडली. ओडिसा आणि झारखंडमधील बौध डिस्टिलरीज प्रायव्हेट लिमिटेडवर (Boudh Distilleries Private Limited) हा छापा टाकण्यात आला. या छाप्यात कंपनीच्या अन्य ठिकाणी अधिकाऱ्यांनी धाड टाकली ज्यात मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली आहे.


आयकर विभागाने आतापर्यंत ओडिसाच्या बोलांगीर, संबलपूर आणि झारखंडच्या रांची, लोहरदगा येथे छापे टाकले. आयटी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारपर्यंत या छापेमारीत जप्त करण्यात आलेल्या रक्कमेपैकी तब्बल ५० कोटी रुपयांच्या नोटांची मोजणी पूर्ण झाली होती, मात्र तरीही मोठ्या प्रमाणावर नोटा शिल्लक होत्या. ज्या ठिकाणी हे छापे टाकले तेथे नोटांची संख्या इतक्या प्रचंड प्रमाणात होती की, नोटांची मोजणी करणारे मशीन बंद पडले. विशेष बाब म्हणजे ही छापेमारी अजूनही सुरूच आहे. अधिकारी आता बौध डिस्टिलरीजच्या अन्य ठिकाणी छापे टाकत आहेत.


बौध डिस्टिलरीजसह आयकर विभागाने झारखंडमधील एक प्रसिद्ध उद्योगपती रामचंद्र रुंगटा यांच्या पंजाब नॅशनल बँकेजवळ असलेल्या निवासी कार्यालयावर छापे टाकले आहेत. रुंगटा यांच्या रामगड, रांची आणि अन्य ठिकाणी तसेच घरांवर आयकर विभागाने सकाळपासून छापे टाकण्यास सुरुवात केली आहे. ही कारवाई सुरू असताना आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांना सीआरपीएफच्या जवानांची सुरक्षा देण्यात आली आहे.

Comments
Add Comment

बिहारमध्ये नव्या सरकारच्या हालचालींना वेग; २२ नोव्हेंबरपूर्वी शपथविधीची शक्यता

पटना : बिहारमध्ये नवं सरकार येत्या २२ नोव्हेंबरपूर्वी स्थापन होईल, अशी माहिती केंद्रीय मंत्री आणि एलजेपीचे

Mumbai CNG Cut : मुंबईत CNGचा मोठा तुटवडा, रिक्षा-टॅक्सी वाहतूक ठप्प; मुंबईकरांचे प्रवास नियोजन कोलमडण्याची शक्यता

वडाळ्यातील गेल पाईपलाईन बिघाडामुळे मुंबईत सीएनजी टंचाई मुंबई : वडाळा परिसरातील गेल गॅसच्या मुख्य

लाल किल्ला स्फोट प्रकरणाचा कट रचणाऱ्या दहशतवाद्याला अटक! कोण आहे आमिर रशीद अली?

दिल्ली: दिल्लीच्या लाल किल्ला परिसरात झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेला मोठे यश

केएफसी आणि मॅकडोनाल्डसारखे फूड ब्रॅण्ड रेल्वेस्थानकांवर उघडणार

रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात केला मोठा बदल नवी दिल्ली : भारतीय रेल्वेने त्यांच्या केटरिंग धोरणात एक मोठा

पुन्हा नितीशकुमारच मुख्यमंत्री

बिहारमध्ये रालोआचे मंत्रिमंडळ स्थापनेबाबत एकमत; भाजपला जास्त प्रतिनिधित्व नवी दिल्ली : बिहार विधानसभा

नवी दिल्ली लाल किल्ला कार स्फोट प्रकरणात तपासात नवे धक्कादायक खुलासे!

नवी दिल्ली : ऐतिहासिक लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबर रोजी घडलेल्या कार स्फोट प्रकरणात तपासाला मोठा वळण आले आहे.