Madhya Pradesh News : बोअरवेलमध्ये अडकलेल्या पाचवर्षीय चिमुकलीची सात-आठ तासांनंतर झाली सुटका, मात्र रुग्णालयात…

Share

राजगड : मध्यप्रदेशात (Madhya Pradesh) एक दुःखदायक घटना घडली आहे. पाच वर्षांची एक चिमुरडी खेळत असताना बोअरवेलमध्ये (Borewell) पडल्याने तिला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करण्यात आली. अखेर आज पहाटे सुटकेनंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यानच चिमुरडीचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबियांची अवस्था फार बिकट झाली आहे.

मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात ही घटना घडली. माही असं या पाचवर्षीय चिमुकलीचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरसिंहगडमधील पिपलिया रसोडा गावात काल संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास माही आजोबांसोबत शेतात गेली होती. तिथे लहान मुलांसोबत खेळत असताना ती अचानक जुन्या बोअरवेलमध्ये पडली. तेथील स्थानिकांनी ताबडतोब प्रशासकीय अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

राजगडचे एसडीआरएफ (SDRF) पथक घटनास्थळी पोहोचले आणि जेसीबी आणि इतर उपकरणे मागवून बचावकार्य सुरू करण्यात आले. या घटनेवर स्वत: मुख्यमंत्री शिवराज सिंह यांनी सतत लक्ष ठेवले. मुलीला ऑक्सिजन पुरवण्याबरोबरच कॅमेरे लावून तिच्या हालचालींवरही लक्ष ठेवले जात होते. NDRF आणि SDRF टीमच्या पथकाला सुमारे ७ ते ८ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर आज पहाटे ३ वाजता माहीला बाहेर काढण्यात यश आले.

माहीला श्वास घेण्यात अडचणी येत होत्या. तिला भोपाळच्या रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले. मात्र तिथे माहीचा मृत्यू झाला. जिल्हा रुग्णालयाचे सीएमएचओ डॉ. किरण वाडिया यांनी सांगितले की, आम्ही मुलीला राजगड येथून थेट रुग्णालयात आणले, मात्र तिचा जीव वाचू शकला नाही. तब्बल नऊ तास माही सुमारे तीस फूट खोल बोअरवेलच्या खड्ड्यात जीवन-मरणाची झुंज देत होती, पण अखेर तिचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Recent Posts

PBKS vs RCB, IPL 2025: घरच्या मैदानावर पंजाब पुन्हा एकदा बेंगळुरूला भिडणार

मुंबई(ज्ञानेश सावंत): रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूचा संघ पावसामुळे मागच्या सामन्यात पंजाब कडून दारुण पराभूत झाला. सुरुवातीचे…

10 minutes ago

पंतप्रधान मोदी २२-२३ एप्रिलला सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढील आठवड्यात सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार,…

39 minutes ago

बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर

ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार मुंबई (प्रतिनिधी) : बनावट पनीर किंवा चीन ऍनालॉग वापरणाऱ्यांवर…

1 hour ago

अनधिकृत इमारतींची संख्या ही ११० ने वाढली

पालिका क्षेत्रात चार हजार ४०७ इमारती धोकादायक ठाणे (वार्ताहर) : ठाणे पालिका क्षेत्रात धोकादायक व…

2 hours ago

जलवाहिनी फुटल्याने २४ तास ‘पाणीबाणीचे’ मुंबईकरांसमोर संकट

काटकसरीने पाण्याचा वापर करण्याचे पालिकेचे आवाहन मुंबई (प्रतिनिधी): मुंबई चेंबूर येथील अमर महल जंक्शनजवळ नागरिकांना…

2 hours ago

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५

साप्ताहिक राशिभविष्य, रविवार, १३ ते १९ एप्रिल २०२५ आर्थिक परिस्थिती मनासारखी राहील मेष : हा…

4 hours ago