Thursday, May 15, 2025

महामुंबईताज्या घडामोडी

Health tips: थंडीच्या दिवसात गरम नको थंड पाण्याने करा आंघोळ, होतील खूप फायदे

Health tips: थंडीच्या दिवसात गरम नको थंड पाण्याने करा आंघोळ, होतील खूप फायदे

मुंबई: थंडीचा कडाका वाढू लागला की पाण्यात हात घालवत नाही. त्यामुळे अनेकजण गरम पाण्याने आंघोळ करणे पसंत करतात. गरम पाण्याने शरीराला आराम मिळतो आणि उबदारपणा मिळतो. दरम्यान, फार कमी लोकांना मााहीत आहे की गरम पाण्याची आंघोळ केल्याने केस आणि त्वचेचे नुकसान होते.


गरम पाण्याने आंघोळ केल्याने त्वचेतून मॉईश्चर आणि नैसर्गिक तेल साफ होते. त्यामुळे त्वचेचा कोरडेपणा वाढतो. यामुळे केसांचा रुक्षपणा वाढतो. यामुळे थंड अथवा नॉर्मल पाण्याने आंघोळ करण्याचा सल्ला दिला जातो. तज्ञही थंड पाण्याने त्वचा आणि केस धुण्याचा सल्ला देतात.


केस राहतात निरोगी - गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांचा रुक्षपणा वाढतो. तसेच केस निर्जीव होतात. अनेकदा केस गळू लागतात. अशातच थंड पाण्याने आंघोळ करावी. यामुळे केस निरोगी बनतात. थंड पाण्याने आंघोळ केल्याने रक्तप्रवाह सुरळीत होतो. यामुळे केसांची त्वचा आणि केसांचा रोमछिद्रे खुलतात.


केसांचा स्काल्प सुधारतो - गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांची त्वचा कोरडी होते. तसेच केसांत कोंडा आणि खाज येते. याउलट थंड पाण्याने आंघोळ केल्यास असे होत नाही.


अॅलर्जी कमी होते. थंड पाणी खाज येत असलेल्या त्वचेवर पडल्यास सूज कमी होते. यामुळे खाजेची समस्याही दूर होते. त्वचेची जळजळही थंड पाण्याने कमी होते.


त्वचेची रोमछिद्रे सुधारतात - थंड पाण्याने आंघोळ केल्यास अनेक फायदे होतात. यामुळे त्वचेमध्ये एक लवचिकपणा येतो. थंड पाण्याने आंघोळ केल्याने रोमछिद्रे खुली होतात. तसेच सुरकुत्या आणि फाईन लाईन्स कमी होतात.

Comments
Add Comment