नवी दिल्ली: देशातील दिग्गज एडटेक कंपनी बायजूची स्थिती इतकी खराब झाली आहे की ते कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही आहत. दरम्यान, कंपनीला या संकटातून बाहेर काढण्यासाठी बायजूच्या फाऊंडरने भावूक करणारे पाऊल उचलले आहे. आपले घर गहाण ठेवत त्यांनी पैसा जमा केला आहे आणि कर्मचाऱ्यांना पगार देण्यास सुरूवात केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार कंपनीच्या साधारण १५ हजार कर्मचाऱ्यांना सोमवारी वेतन देण्यात आले.
दोन घर आणि एक व्हिला ठेवले गहाण
मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीचे फाऊंडर बायजू रविंद्रन यांनी बंगळुरू येथील आपली दोन घरे आणि एक निर्माणावस्थेतील व्हिला गहाण ठेवत १२ मिलियन डॉलर इतकी रक्कम मिळवली. या पैशांचा वापर त्यांनी पगार देण्यासाठी केला. रवींद्रने केवळ आपलेच नाही तर कुटुंबातील सदस्याचे स्वामित्व असलेले घरही गहाण ठेवले. शिक्षणाच्या क्षेत्रातील दिग्गज कंपनी बायजू सध्या भयंकर आर्थिक संकटाचा सामना करत आहे.
कंपनीचे कोणतेही विधान नाही
दरम्यान, याबाबत कंपनी अथवा रवींद्रन यांच्या ऑफिसकडून कोणतेही विधान करण्यात आलेले नाही. स्टार्टअपने सोमवारी हा पैसा बायजूची पॅरेंट कंपनी थिँक अँड लर्न प्रायव्हेट लिमिटेला सुपूर्द केले. यामुळे कर्मचाऱ्यांना पगार दिला जाऊ शकतो.
आर्थिक संकटाशी सामना
बायजूला एकेकाळी भारतातील सर्वात मौल्यवान टेक स्टार्टअप मानले गेले होते. पैशांची अडचण दूर करण्यासाठी कंपनीने आपल्या अमेरिका स्थित डिजीटल रिडींग प्लॅटफॉर्मला ४०० मिलियन डॉलरमध्ये विकण्यास सुरूवात केली आहे. हे संकट तेव्हा आले तेव्हा बायजू १.२ बिलिन डॉलरचे टर्म लोनचा ईएमआय चुकता करण्यास अयशस्वी ठरले.
बीसीसीआयनेही कोर्टात खेचले
जेव्हा बायजूची मोठी प्रगती होत होती तेव्हा भारतीय क्रिकेट टीमचीही स्पॉन्सर बनली होती. दरम्यान, नंतर त्यांनी टीम इंडियाच्या जर्सीवरून आपले नाव हटवले. दरम्यान, बीसीसीआय आणि बायजू कायद्याच्या वादात अडकले आहेत.