Singham Again : बॉलिवूडच्या सिंघमला शूटिंगदरम्यान दुखापत; पण ठरवलं 'शो मस्ट गो ऑन'!

मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) सिंघम म्हणजेच अजय देवगण (Ajay Devgan) त्याच्या आगामी 'सिंघम अगेन' (Singham Again) चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि यातील कलाकार समोर आल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते भलतेच उत्सुक आहेत. मात्र, या सिनेमाच्या सेटवर अजयला शूटिंगदरम्यान दुखापत झाली. एक अॅक्शन सीक्वेन्स (Action Sequence) शूट करत असताना अजयच्या डोळ्याला जखम झाली.


सिंघमनंतर सिंघम रिटर्न्स (Singham Returns) हा चित्रपटही प्रचंड गाजला. यानंतर आता सिंघम अगेनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचसोबत साधारण त्याच धाटणीचा रणवीर सिंगचा (Ranveer Singh) सिम्बाही (Simmba) प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे या दोन्ही सिनेमांचा दिग्दर्शक बॉलिवूडचा लोकप्रिय रोहित शेट्टी (Rohit Shetty) सगळ्यांचा आवडता बनला आहे. एकावर एक हिट सिनेमे देण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.


सिंघम अगेनसाठी रोहित शेट्टी आणि त्याची टीम मुंबईतील विले पार्ले परिसरात शूटिंग करत होती. दरम्यान अॅक्शन सीन शूट करताना अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत झाली. अजय देवगण एक कॉम्बैट सीक्वेंस शूट करत होता. त्यावेळी त्याच्या डोळ्याला दुखापत झाली.


हा अपघात झाल्यानंतर अजय देवगणने थोडा वेळ ब्रेक घेतला. सेटवर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. दरम्यान रोहितने खलनायकांवर आधारित असलेल्या काही दृश्यांचं शूटिंग पूर्ण केलं. कामाला प्राधान्य देणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अजयची गणना होते. यंदादेखील त्याने आधी 'शो मस्ट गो ऑन' असं म्हणत नियोजित शूटिंग पूर्ण केलं.


'सिंघम अगेन' या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. अजयसह करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि दीपिका पादुकोणदेखील (Deepika Padukone) या सिनेमाचा भाग आहेत. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अक्षय कुमारदेखील (Akshay Kumar) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. 'सिंघम अगेन'ची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची वाट पाहत आहेत.

Comments
Add Comment

Mumbai Tree Collapse Incidents : मुंबईतील झाडांच्या फांद्यांची छाटणी, तर पडझड होते कशी?

मुंबई : मुंबईत चेंबूर (Chembur) येथील झाडांच्या दुघर्टनांमध्ये मोठ्याप्रमाणात वाढ होत असून आतापर्यंत एक लाखांहून

Mumbai Red Alert : मुंबईला दोन दिवसांचा रेड अलर्ट! ७ जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा

मुंबई : राज्यात पावसाचा (Rain) जोर आणखी वाढण्याची शक्यता असून प्रादेशिक हवामान विभागाने (India Meteorological Department - IMD) मुंबई, ठाणे,

महापौरांच्या दालनात शिरुन विरोधी पक्षनेत्यांची कर्मचाऱ्यांना दमदाटी

महापौरांनी केला घुसखोरीचा आरोप, पोलिसांत नोंदवणार तक्रार मुंबई  (Mumbai): मुंबई महापौर रितू तावडे या कार्यालयात

रुग्ण संवाद, उपचार आणि चिकित्सेसाठी आता वैद्य एआय विकसित

रूग्णालय तसेच दवाखान्याच्या ठिकाणी प्रायोगिक तत्वावर प्रणालीचा वापर मुंबई : रूग्णांशी संबंधित रक्तचाचणी

Sassoon Dock : फिनलँडच्या कंपन्यांच्या सहकार्याने होणार ससून डॉकचे आधुनिकीकरण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री नितेश राणे यांच्यात बैठक

मुंबई : मुंबईतील ऐतिहासिक ससून डॉकचे (Sassoon Dock) डिजिटायझेशन आणि आधुनिकीकरण करून त्याला जागतिक दर्जाचे व

Rain deaths : मुसळधार पावसात आतापर्यंत ५ जणांचा मृत्यू; नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर

मुंबई (Mumbai): मुंबई महानगर प्रदेश आणि आसपासच्या परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत