Singham Again : बॉलिवूडच्या सिंघमला शूटिंगदरम्यान दुखापत; पण ठरवलं ‘शो मस्ट गो ऑन’!

Share

मुंबई : बॉलिवूडचा (Bollywood) सिंघम म्हणजेच अजय देवगण (Ajay Devgan) त्याच्या आगामी ‘सिंघम अगेन’ (Singham Again) चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. या सिनेमाचे पोस्टर आणि यातील कलाकार समोर आल्यानंतर हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते भलतेच उत्सुक आहेत. मात्र, या सिनेमाच्या सेटवर अजयला शूटिंगदरम्यान दुखापत झाली. एक अॅक्शन सीक्वेन्स (Action Sequence) शूट करत असताना अजयच्या डोळ्याला जखम झाली.

सिंघमनंतर सिंघम रिटर्न्स (Singham Returns) हा चित्रपटही प्रचंड गाजला. यानंतर आता सिंघम अगेनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. त्याचसोबत साधारण त्याच धाटणीचा रणवीर सिंगचा (Ranveer Singh) सिम्बाही (Simmba) प्रेक्षकांना आवडला. त्यामुळे या दोन्ही सिनेमांचा दिग्दर्शक बॉलिवूडचा लोकप्रिय रोहित शेट्टी (Rohit Shetty) सगळ्यांचा आवडता बनला आहे. एकावर एक हिट सिनेमे देण्यासाठी तो प्रसिद्ध आहे.

सिंघम अगेनसाठी रोहित शेट्टी आणि त्याची टीम मुंबईतील विले पार्ले परिसरात शूटिंग करत होती. दरम्यान अॅक्शन सीन शूट करताना अजय देवगणच्या डोळ्याला दुखापत झाली. अजय देवगण एक कॉम्बैट सीक्वेंस शूट करत होता. त्यावेळी त्याच्या डोळ्याला दुखापत झाली.

हा अपघात झाल्यानंतर अजय देवगणने थोडा वेळ ब्रेक घेतला. सेटवर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केले. दरम्यान रोहितने खलनायकांवर आधारित असलेल्या काही दृश्यांचं शूटिंग पूर्ण केलं. कामाला प्राधान्य देणाऱ्या अभिनेत्यांमध्ये अजयची गणना होते. यंदादेखील त्याने आधी ‘शो मस्ट गो ऑन’ असं म्हणत नियोजित शूटिंग पूर्ण केलं.

‘सिंघम अगेन’ या सिनेमात अजय देवगण मुख्य भूमिकेत आहे. अजयसह करीना कपूर खान (Kareena Kapoor Khan) आणि दीपिका पादुकोणदेखील (Deepika Padukone) या सिनेमाचा भाग आहेत. रणवीर सिंह (Ranveer Singh) आणि अक्षय कुमारदेखील (Akshay Kumar) या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. ‘सिंघम अगेन’ची घोषणा झाल्यापासून चाहते या सिनेमाची वाट पाहत आहेत.

Recent Posts

Team india: बीसीसीआयकडून टीम इंडियाला १२५ कोटींचे बक्षीस

मुंबई: टी-२० वर्ल्डकप २०२४ जिंकणाऱ्या टीम इंडियाचे मुंबईत जोरदार स्वागत झाले. लाखो मुंबईकरांनी टीम इंडियाच्या…

7 hours ago

Indian player: विश्वविजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंसाठी शिंदे सरकारकडून बक्षीस जाहीर

मुंबई: रोहित शर्माच्या नेतृत्वातील भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप जिंकत मोठा इतिहास रचला आहे. या टीम…

8 hours ago

Shubh: शुभ काम करण्याआधी का खातात दही-साखर, हे खरंच शुभ असतं का?

मुंबई: दही साखर हातात ठेवणे ही हिंदू धर्मातील महत्त्वाची परंपरा आहे. दही-साखर खाणे शुभ मानले…

9 hours ago

नूतन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अखेर १२ वर्षानंतर कार्यान्वीत

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या अथक प्रयत्नांना यश मुंबई : गोकुळदास तेजपाल रुग्णालय, मुंबई…

9 hours ago

Video: मरीन ड्राईव्हवर गर्दीत अडकली अ‍ॅम्ब्युलन्स, चाहत्यांनी असा दिला रस्ता

मुंबई: मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर आलेल्या लाखो चाहत्यांमध्ये सहकार्य आणि सहृदयतेचे अद्भुत दृश्य पाहायला मिळाले. वर्ल्डकप…

10 hours ago

Team India Victory Parade: टी-२० चॅम्पियन्सचे मुंबईत ग्रँड वेलकम, मरिन ड्राईव्हवर चाहत्यांची गर्दी

मुंबई: टीम इंडिया(team india) विक्ट्री परेडसाठी मुंबईत पोहोचले आहेत. भारतीय संघाचे मुंबई एअरपोर्टवर दिमाखात स्वागत…

10 hours ago