ब्रँडेडच्या नावे मुंबईत बनावट घड्याळांची विक्री!

९ दुकानांवर पोलिसांचे छापे; ६ कोटींची १,५३७ बनावट घड्याळे जप्त


मुंबई : राडो, टिसॉट, ओमेगा, ऑडेमार्स पिगेट, ह्यू बॉस (Rado, Tissot, Omega, Audemars Piguet, Huw Boss) या प्रसिद्ध ब्रँडच्या नावाखाली बनावट घड्याळे (Fake Branded Watch) विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) केला आहे. संबंधीत कंपन्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


मुंबई पोलिसांनी मुसाफिरखाना, फातिमा मंझील बिल्डिंग येथील एटी मार्केटमधील ९ दुकानांवर धाड टाकून प्रसिद्ध ब्रँडची तब्बल ६ कोटी रुपयांची १ हजार ५३७ बनावट घड्याळे जप्त करत चार जणांना ताब्यात घेतले आहे.


या प्रकरणी घेवाराम अण्णाराम चौधरी, भावेशकुमार औखाजी प्रजापती , गणेश नारायण भारती आणि मोहम्मद शोएब अब्दुल गनी कुरेशी या संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहे. प्रसिद्ध कंपन्यांची ब्रँडेड घड्याळे अनधिकृतरित्या बनबून ती बाजारात विक्री केली जात होती. याबाबत संबंधिक कंपन्यांच्या प्रतिनिधींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यावरून मुंबई गु्न्हे शाखा युनिट २ ने मुसाफिरखाना, फातिमा मंझील बिल्डिंग येथील ९ दुकानांपर छापे टाकले.


आरोपींविरुद्ध फसवणूक आणि कॉपीराइट कायद्याच्या संबंधित तरतुदींनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच बनावट घड्याळे बनवण्यात अजून कोणी सामिल आहे का, याचा शोध सुरू आहे.

Comments
Add Comment

आनंदाची बातमी, मुंबईचे ससून बंदर होणार 'ग्लोबल'

जगातील सर्वोत्तम बंदर बनविण्याचा मंत्री नितेश राणे यांचा संकल्प; फिनलंडच्या मदतीने कायापालट करणार मुंबई :

‘वन नेशन-वन रेशन’मध्ये महाराष्ट्र अव्वल

- १८.९७ लाख परप्रांतीयांनी घेतले धान्य; शिवभोजन थाळीचाही ४ कोटींचा टप्पा पार मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी

Mumbai Metro : महिला दिनी मेट्रोची ‘कमान’ महिलांच्या हाती

मुंबई : आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (MMRC) कडून एक विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे.

Women's Day : जागतिक महिला दिनानिमित्त राज्यात ‘एचपीव्ही’ लसीकरण मोहीमेचा शुभारंभ

- आरोग्य क्षेत्रातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान मुंबई : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सार्वजनिक आरोग्य

मध्य रेल्वेवर रविवारी 'मेगाब्लॉक'

मुंबई (प्रतिनिधी) : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी रविवारी

पश्चिम रेल्वेच्या ४ विशेष सुपरफास्ट गाड्या!

मुंबई (प्रतिनिधी) : प्रवाशांची वाढती गर्दी आणि प्रवासाची मागणी लक्षात घेऊन पश्चिम रेल्वेने वांद्रे, अहमदाबाद,